तूर खरेदी केंद्रावर ९५०० क्विंटल तूर बाकी

By Admin | Updated: April 30, 2017 19:34 IST2017-04-30T19:34:39+5:302017-04-30T19:34:39+5:30

लोणार- तूर खरेदी रखडल्यामुळे शेतकºयांना एक एक दिवस मोजावा लागत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अजुनही ९५00 क्विंटल तूर मोजमापाच्या प्रतिक्षेत आहे.

9 500 quintals of tur to rest in the purchase center | तूर खरेदी केंद्रावर ९५०० क्विंटल तूर बाकी

तूर खरेदी केंद्रावर ९५०० क्विंटल तूर बाकी

लोणार : २२ एप्रिल  पर्यंत बाजार समितीच्या आवारामध्ये असणाऱ्या वाहनांची तूर खरेदी करण्याची तयारी शासनाने दाखवली आहे. परंतु या बाबत अद्याप निर्देश आलेले नसल्यामुळे खरेदी प्रक्रिया नव्याने केव्हा सुरू होणार या बाबत शेतक?्यांना उत्सूकता आहे. गेल्या दोन महिन्यांपासून खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांना एकेक दिवस मोजावा लागत आहे. दरम्यान लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये मोजमाप न झालेली  ९५०० क्विंटल तूर आहे.
  २२ एप्रिल रोजी शासकीय तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आलेले आहेत. लोणार येथील भारतीय खाद्य निगम चे तूर खरेदी केंद्र व  कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे तूर केव्हापासून पुन्हा खरेदी करायची याविषयी निर्देश नाहीत. त्यामुळे खरेदी केव्हा सुरु होणार हे कोणीही सांगायला तयार नाही. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तुरीचे माप लवकर होत नाही ही काळजी
आणि डोक्यावर रणरणते उन असा मार त्यांना सहन करावा लागत आहे. वाहन आणि रोजचा खर्च वेगळा. शेतकऱ्यांना तुरीचे पैसे मोकळे झाले की खरीपाची तयारी करायची आहे. बाजारातून बियाणे खरेदीसाठी त्यांना पैशाची गरज आहे आणि खुल्या बाजारामध्ये तूर विकल्यास हजार रुपयांचे नुकसान होत असल्यामुळे तूर उत्पादक कैचीत सापडला आहे.
शासकीय तूर खरेदी केंद्र जानेवारी मध्ये सुरु झाले होते . त्यावेळेस खाजगी व्यापा?्यांनी तूरीचे भाव ३८००  रुपये  वरून ४२००  रुपये पर्यंत वाढ केली होती.परंतु शासकीय तूर खरेदी केंद्र बारदाण्या अभावी सतत बंद राहत असल्याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी तूरीचे भाव पुन्हा  ३५०० ते ३८०० रुपयांवर आणून ठेवला आहे .यामुळे लग्नसराईत कैचीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांना पैशासाठी कमी भावात तूर विकावी लागलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी ३५०० -३८०० रुपये प्रमाणे तुरीची खरेदी करत आहेत. शासकीय तूर खरेदी  दराचा विचार करता हजार रुपयांचा फरक आहे. ज्यांना पैसा मोकळा करायचा आहे ते शेतकरी व्यापाऱ्यांना माल देत आहेत. परंतु बहुतांश शेतकरी शासकीय तूर खरेदीची वाट पाहत आहेत.यामुळे २२ एप्रिल पर्यंत बाजार समितीच्या आवारामध्ये असणाऱ्या वाहनांची तूर खरेदी करण्याची तयारी शासनाने दाखवली आहे.त्यानुषंगाने २७ एप्रिल रोजी लोणार कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये असलेल्या तूरीचा पंचनामा करून त्याबाबतचा अहवाल सनियंत्रण समिती अध्यक्ष उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केला आहे.यावेळी कृउबा समिती सभापती शिवपाटील तेजनकर, तहसिलदार सुरेश कव्हळे , संजय भोईटे, मार्केटिंग फेडरेशन सदस्य, लोणार खरेदी-विक्री संघ सदस्य,सचिव वायाळ, कृ.ऊ.बा. संचालक उपस्थित होते.

Web Title: 9 500 quintals of tur to rest in the purchase center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.