९३ गावांमध्ये ‘महिला राज’
By Admin | Updated: September 1, 2015 01:40 IST2015-09-01T01:40:42+5:302015-09-01T01:40:42+5:30
सरपंचपदाची निवडणूक शांततेत; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोथळीत यश.

९३ गावांमध्ये ‘महिला राज’
बुलडाणा : जिल्ह्यातील २२८ ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक सोमवारी शांततेत पार पडली. या निवडणुकीत बुलडाणा, मोताळा आणि देऊळगावराजा, खामगाव, नांदुरा तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान झाले आहेत. मोताळा तालुक्यातील कोथळी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला सदस्य सरपंच झाल्याने तालुक्यात संघटनेला यश मिळाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणातील पहिले पाऊल म्हणून ओळखल्या जाणार्या आणि ग्रामीण भागातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या सरपंच पदाच्या या निवडणुका अत्यंत अटीतटीच्या झाल्या. यामध्ये बुलडाणा तालु क्यात निवडणूक पार पडलेल्या ५१ ग्रामपंचायतीपैकी आज पहिल्या टप्प्यात २६ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये २६ पैकी १५ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच झाल्या. मोताळा तालुक्यात २४ ग्रामपंचायतींच्या आज झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये १४ तर देऊळगावराजा तालुक्यात २३ पैकी १९ ग्रामपंचायतींवर महिलांना संधी मिळाली आहे. तर चिखली तालुक्यात ५८ ग्रामपंचायतींपैकी ४0 ग्रामपंचायतींवर महिलांची सत्ता आली आहे.