898 positive, four deaths in the district | जिल्ह्यात ८९८ पॉझिटिव्ह, चार जणांचा मृत्यू

जिल्ह्यात ८९८ पॉझिटिव्ह, चार जणांचा मृत्यू

प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४७४ व रॅपिड टेस्टमधील ४२४ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून ७४० तर रॅपिड टेस्टमधील ६ हजार ८८१ अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे आहेत. बुलडाणा शहर व तालुका २१०, खामगाव शहर व तालुका ६४, शेगाव शहर व तालुका २९, देऊळगावराजा तालुका व शहर ६४, चिखली शहर व तालुका १२०, मेहकर शहर व तालुका १८२, मलकापूर शहर व तालुका २१, नांदुरा शहर व तालुका ६२, लोणार शहर व तालुका १४, मोताळा शहर व तालुका ८८, जळगाव जामोद शहर व तालुका ८, सिंदखेडराजा शहर व तालुका ३५ आणि संग्रामपूर शहर व तालुका १ संदिग्ध व्यक्ती असे एकूण ८९८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान नांदुरा तालुक्यातील येथील ७० वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील सरस्वती नगरातील ५५ वर्षीय पुरुष, बुलडाणा तालुक्यातील मातला येथील ८५ वर्षीय पुरुष आणि मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील ३८ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रविवारी ७११ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत २ लाख ७१ हजार ५६० अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

कोरोना बाधितांचा आकडा ४६ हजारांवर

जिल्ह्यात आज अखेर एकूण ४६ हजार १८९ कोरोनाबाधित रुग्ण असून आजपर्यंत ३९ हजार ९३२ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी ५ हजार २५४ नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत ३०६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: 898 positive, four deaths in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.