८३ हजारांचा अवैध गुटखा जप्त
By Admin | Updated: August 28, 2015 00:19 IST2015-08-28T00:19:12+5:302015-08-28T00:19:12+5:30
डोणगाव येथे ८३ हजारांचा अवैध गुटखा जप्त; तिघांना अटक, एक फरार.

८३ हजारांचा अवैध गुटखा जप्त
डोणगाव (जि. बुलडाणा): स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत काही दिवसांपासून गुटख्याची सर्रास विक्री सुरू होती. २६ ऑगस्टला रात्री १.३0 वाजता पेट्रोलिंग करताना पोलीस पथकाने गोहोगाव फाट्यावरून शेलगावकडे जाणारी मोटारसायकल (एम.एच.२८ एए - ६८१२) पकडली. त्यांच्याकडून ५३ हजार १00 किमतीचा गुटखा पोलिसांनी ताब्यात घेतला. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली, तर एक आरोपी फरार झाला. ठाणेदार विशाल पाटील यांच्या मार्गादर्शनात पोलीस पथकाने २६ ऑगस्टला रात्री १.३0 वाजता गोहोगाव फाट्यावरून शेलगावकडे जाणार्या मोटारसायकलस्वार सैयद सरफरोश सैय्यद उस्मान व हमीदशाह नादरशाह यास अडविले. त्यांच्याकडे अवैध गुटखा साठा आढळून आला. त्यांच्याकडे चौकशी केली असता, सदर माल हा डोणगाव येथील गजानन साखळकर व सचिन साखळकर यांचा असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगि तले. यावरून आरोपी सरफरोश सैयद उस्मान, हमीदशाह नादरशाह आणि गजानन साखळकर या तिघांना अन्नसुरक्षा अधिकारी भाऊराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अटक केली. याशिवाय चारही आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम २७३, १८८ व अन्न सुरक्षा मानक कायदा कलम ५९ (१,२,३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील चौथा आरोपी सचिन साखळकर हा फरार आहे.