८.२८ लाखांचा गुटखा जप्त

By Admin | Updated: October 27, 2016 03:27 IST2016-10-27T03:27:18+5:302016-10-27T03:27:18+5:30

मलकापूर येथे पोलिसांची कारवाई

8.28 lakh worth of gutka seized | ८.२८ लाखांचा गुटखा जप्त

८.२८ लाखांचा गुटखा जप्त

मलकापूर , दि. २७- प्रतिबंधित गुटखा पुड्यांच्या साठय़ावर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र साळुंके यांनी धाड टाकून तब्बल ८ लाख २८ हजार २00 रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई २५ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास वाघुळ शिवारातील मॉ शाकंबरी जिनात केली.
गुटख्याचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने मॉ शाकंबरी जिनातील एका खोलीत बेकायदेशीर साठवून ठेवल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र साळुंके यांना प्राप्त झाली होती. त्यावरून त्यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. नारायणराव तांदळे, पोउपनि रूपेश शक्करगे, एएसआय ब्रिजलाल मापारी, पोहेकाँ मुंडे, पो.ना. श्याम शिरसाट, तय्यब अली, अशोक म्हस्के आदींनी सदर ठिकाणी धाड टाकून ८ लाख २८ हजार २00 रुपयांचा गुटखा व तंबाखूचा साठा जप्त केला. याप्रकरणी बंटी ऊर्फ ब्रिजलाल भगवानदास खत्री (वय २९) रा. सिंधी कॉलनी मलकापूर याला ताब्यात घेतले असून, सदरची माहिती अन्न व सुरक्षा अधिकारी बुलडाणा यांना दिली. त्यावरून अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहुरे हे मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दाखल झाले आहेत.

Web Title: 8.28 lakh worth of gutka seized