सहा लाख वीज ग्राहकांचा भार ८२0 तांत्रिक कामगारांवर!
By Admin | Updated: December 6, 2014 00:11 IST2014-12-06T00:11:12+5:302014-12-06T00:11:12+5:30
वरिष्ठांकडे तक्रार : विविध जबाबदा-या वाढल्याने मानसिक खच्चीकरण.

सहा लाख वीज ग्राहकांचा भार ८२0 तांत्रिक कामगारांवर!
हनुमान जगताप / मलकापूर
मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात महावितरण कंपनी अंतर्गत सुमारे सव्वा सहा लाख वीज ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी केवळ ८२0 तांत्रिक कामगार कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यापैकी ४0 टक्के नवृत्तीच्या वाटेवर आहेत. अर्थात २५ वर्षानंतर वीजसेवकांची भरती झाली. वाढते वय, कामाचा व्याप, त्यात वसुलीचा भार यामुळे जिल्ह्यातील तांत्रिक कामगार मानसिकदृष्ट्या खचल्याचे दिसत असून, शासन त्याकडे लक्ष देईल का? हा सवाल आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, महावितरण कंपनी अखत्यारीत विविध प्रकारचे सुमारे सव्वा सहा लाख वीज ग्राहक आहेत. त्यांच्या तक्रार निवारणासाठी ८२0 तांत्रिक कामगार आहे त. जिल्ह्यात ३ विभागीय तर १५ उपविभागीय कार्यालय आहेत. तक्रार निवारण केंद्र ७७, ११ केव्ही सबस्टेशन ६0 आहेत. यावरून लक्षात येते की एचटीचे २६४, बीपीएल १९ हजार २४२, घरगुती ३ लाख ५३ हजार ९८८, व्यावसायिक २0 हजार ८६१, औद्योगिक ५ हजार ५८९ असे आहेत. दुसरीकडे २५ वर्षे नवीन भरती नाही. आजमितीस केवळ ८२0 तांत्रिक कामगार आहेत. त्यापैकी ४0 टक्के सेवानवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्यांच्या कामाचा व्याप वाढला आहे. दिम तीला वसुलीचाही धाक असल्याचे कामगार संघटनांच्या आजवरच्या पाठपुराव्यावरून स्पष्ट होते आणि त्यातूनच जिल्ह्यातील महावितरणचे तांत्रिक कामगार मानसिकदृष्ट्या खचल्याचे उघड हो ते.