नगरपंचायतीसाठी ८१.९३ टक्के मतदान

By Admin | Updated: November 2, 2015 02:48 IST2015-11-02T02:48:39+5:302015-11-02T02:48:39+5:30

मोताळा येथे आज मतमोजणी, प्रशासनाची तयारी पूर्ण, निकालाची उत्सुकता शिगेला.

81.93 percent polling for the Nagar Panchayat | नगरपंचायतीसाठी ८१.९३ टक्के मतदान

नगरपंचायतीसाठी ८१.९३ टक्के मतदान

मोताळा (जि. बुलडाणा): लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीनंतर अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या मोताळा नगरपंचायत निवडणुकीत १७ उमेदवारांकरिता १ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते ५:३0 पर्यंंंत शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी मोताळा शहरातील १७ मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानात ८१.९३ टक्के मतदान झाले. निवडणुकीत ६५८६ स्त्री-पुरुष मतदारांपैकी ५३९६ (२९४१ पुरुष व २४५५ स्त्री) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुमारे ६२ वर्षांंंच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच नगरपंचायतीची निवडणूक झाल्याने उमेदवारांसह स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बनलेल्या निवडणुकीत मतदारांनी सकाळपासूनच उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, या निवडणुकीत मोताळा शहरातील एकूण ८५ उमेदवारांचे भाग्य मशीनमध्ये बंद झाले असून, मतदारांनी नेमका कुणाला कौल दिला आहे, याचा खुलासा सोमवार २ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजेपासून स्थानिक तहसील कार्यालयातील मतमोजणीस्थळी होणार आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेली नगरपंचायतीची रणधुमाळी १ नोव्हेंबरच्या संध्याकाळी ५:३0 वाजता संपली. शहरातील १७ प्रभागांतील १७ उमेदवारांकरिता सकाळी ७ ते ५:३0 मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी मोताळा शहरातील १७ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. मोताळा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक १ नोव्हेंबर रोजी होऊ घातली होती. निवडणुकीत १७ जागांसाठी ८५ उमेदवार रिंगणात उतरले होते. रविवारी या उमेदवारांचे भाग्य मतदारांनी मतपेटीत बंद केले आहे. सोमवारी २ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: 81.93 percent polling for the Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.