८0 हजार कुटुंबांच्या घेतल्या स्वच्छतेसाठी भेटी!
By Admin | Updated: October 9, 2016 02:05 IST2016-10-09T02:05:08+5:302016-10-09T02:05:08+5:30
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ४८३ ग्रामपंचायतीमधील ७९,९३२ हजार कुटुंबांना गृहभेटी देण्यात आल्या.

८0 हजार कुटुंबांच्या घेतल्या स्वच्छतेसाठी भेटी!
खामगाव(जि. बुलडाणा), दि. 0८-स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी सुरू असून, २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यातील ८0 हजार कुटुंबांच्या गृहभेटी आटोपल्या आहेत. शौचालय बांधकामाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर आता उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्ह्यातील ४८३ ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद प्रशासन कामाला लागले आहे.
स्वच्छ महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण या राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.) सन २0१६-१७ या वार्षिक कृती आराखड्यांतर्गत समाविष्ट ग्राम पंचायतीमधील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात व्यापक स्वरूपात गृहभेटी अभियान राबविण्यात आले. या कालावधीत जिल्ह्यातील ४८३ ग्रामपंचायतीमधील ७९,९३२ हजार कुटुंबांना गृहभेटी देण्यात आल्या. समु पदेशन करून शौचालय बांधकामासाठी नागरिकांना प्रवृत्त करण्यात आले आहे.
शौचालयाचे बांधकाम आणि वापर, लहान मुलांच्या विष्ठेचे सुयोग्य व्यवस्थापन, महत्त्वाच्या वेळी साबणाने हात धुण्याचे महत्त्व तसेच उघड्यावरती शौचविधीचे लक्षण पुसून टाकण्यासाठी स्वच्छता संदेशातून माहिती देण्यात आली. गृहभेटी अभियानात बुलडाणा जिल्ह्यातील ८६४ ग्रामपंचायतींपैकी ४८३ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे.
या ग्रामपंचायतींच्या भेटी आटोपल्या असून, आता शौचालय बांधकाम वाढविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कामाला लागले आहे. स्वच्छ भारत मिशन यशस्वीतेसाठी गृहभेट अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
गृहभेटीत अधिकारी, पदाधिका-यांचाही समावेश
*स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) गृहभेट अभियान जिल्ह्यात राबविण्यात आले आहे. शौचालय बांधकाम आणि वापरासाठी नागरिकांची मानसिक तयारी करण्यासाठी जि.प., पं.स. अधिकार्यांसह पदाधिकार्यांचाही समावेश महत्त्वाचा ठरला.
*ज्या गावात १00 पेक्षा कमी शौचालय आहेत अशा गावामध्ये शौचालय बांधकाम वाढविण्यासाठी भर देण्यात येत आहे. गृहभेटीत पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी यासह शासकीय कर्मचार्यांचा समावेश होता.
तालुकानिहाय ग्रा.पं. संख्या व उद्दिष्ट
पं.स. ग्रा.पं. उद्दिष्ट
बुलडाणा ३३ ७0६३
चिखली ४९ ११९४९
दे.राजा २३ ४0७८
सिंदखेडराजा ३७ ४४९0
लोणार ३१ ५५५८
मेहकर ४७ १0४९६
खामगाव ४७ ६९२४
शेगाव ४७ ६७७६
संग्रामपूर २३ १६९४
जळगाव जा. ३0 ५४९३
नांदुरा ३५ ४६९0
मलकापूर ४९ ४९३२
मोताळा ३२ ५७८९