लोकशाही दिनाची कार्यवाहीत ८ तक्रारी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 13:33 IST2017-10-04T13:33:50+5:302017-10-04T13:33:59+5:30

8 complaints received in Lokshahi Din proceedings | लोकशाही दिनाची कार्यवाहीत ८ तक्रारी प्राप्त

लोकशाही दिनाची कार्यवाहीत ८ तक्रारी प्राप्त

 बुलडाणा  : लोकशाही दिन कार्यवाहीला नागरिक विविध विभागांच्या संबंधीत तक्रारी दाखल करीत असतात.  या तक्रारींवर विहीत कालावधीत कार्यवाही होवून तक्रारदाराला उत्तर मिळायला पाहिजे. तरी विभागांनी तक्रारींचे निसरन करून तक्रारदाराला समाधान द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकशाही दिनाच्या कार्यवाहीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराज, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद देशमुख,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, भूमि अभिलेख अधिक्षक जाधव, तहसीलदार शैलेश काळे, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: 8 complaints received in Lokshahi Din proceedings