८९ बार व दारू दुकाने नियमबाह्य

By Admin | Updated: July 10, 2015 00:12 IST2015-07-10T00:12:51+5:302015-07-10T00:12:51+5:30

राज्य मार्गापासून हवे ५0 मीटर अंतर; उत्पादन शुल्क आयुक्ताच्या आदेशाला हरताळ.

8 9 times and liquor shops out of the rules | ८९ बार व दारू दुकाने नियमबाह्य

८९ बार व दारू दुकाने नियमबाह्य

सिद्धार्थ आराख/ बुलडाणा : राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गापासून बिअर बारचे अंतर ७५ मीटरच्या आत असल्यास अशा बारचा परवाना रद्द करण्यात यावा, या उत्पादन शुल्क आयुक्तांच्या आदेशाला बुलडाणा जिल्ह्यात हरताळ फासल्या जात आहे. मागील दोन वर्षात अशा प्रकारे जिल्ह्यात एकाही बारवर कारवाई करण्यात आलेली नाही. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून वाईन बार (परमीट रूम) अनुक्रमे ५0 आणि ७५ मीटरपेक्षा जास्त अंतरावर असणे गरजेचे आहे. बार अगदी रस्त्यालगत असल्यास महामार्गावरून जाणारे वाहनधारक तिथे आपले वाहन उभे करून त्या बारमध्ये मद्यप्राशन करून निघतात आणि त्याच अवस् थेत वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरतात. परिणामी स्वत: बरोबरच दुसर्‍याच्याही जीवित्वाला धोका निर्माण होतो. अशा प्रकारचे अपघात टाळल्या जावेत यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील बार व दारू दुकानासाठी काही नियम घालून दिला आहे. या नियमाचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात कोठेच पालन झालेले नाही. त्याचाच गैरफायदा घेत अनेक बारमालकांनी महामार्गाच्या कडेलाच आपले बार थाटले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून मलकापूर सोलापूर, जालना खामगाव, मालेगाव- मेहकर- सिंदखेडराजा हे राज्य मार्ग तर मुंबई कोलकता हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला बिअर बार (परमिट रुम) थाटण्यात आले आहेत. वास्तविक उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार राज्य मार्गापासून ५0 मीटर तर, राष्ट्रीय महामार्गापासून ७५ मीटर अंतरावर बिअर बार व दारू विक्रीची दुकाने असावीत, असा नियम असताना हा नियमाचे सर्वत्र उल्लंघन करण्यात आले आहे.

*अहवाला सादर केला, मात्र कारवाई नाही

        राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी ३ मे २0१३ तसेच ३१ जुलै २0१४ असे दोन वेळा राज्यातील सर्व उत्पादन शुल्क अधीक्षकांना पत्र देऊन या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासोबतच महामार्गावरील सर्व बार ५0 आणि ७५ मीटर अंतराच्या नियमांत बसतात की नाही, याची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. जे बार नियमात बसणार नाहीत त्यांचा परवाना त्वरित रद्द करण्याचेही आदेश या पत्रान्वये देण्यात आले होते.या आदेशानुसार उत्पादन शुल्क विभागाने वरिष्ठांना दिलेल्या अहवालात केवळ किती दारू दुकाने व बिअर बार राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून किती अंतरावर आहेत एवढाच अहवाल शासनाकडे सादर केला आहे. त्यावर काय कारवाई केली, याचा मात्र कोठेही उल्लेख नाही.

*आयुक्ताच्या आदेशाचा फुसका बार

    राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत असणार्‍या ह्यबिअर बारह्ण चा परवाना रद्द करण्याचा आदेश एक्साईज विभागाच्या (राज्य उत्पादक शुल्क) आयुक्तांनी दोन वर्षांपूर्वी काढला होता; मात्र बुलडाणा जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी या आदेशाला केराची टोपली दाखविली. उत्पादन शुल्क विभागाने काढलेल्या या आदेशावर कोणतीही अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने काढलेला हा आदेश अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे बारमालकांना संरक्षणाचा ठरत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनी काढलेल्या परिपत्रकाचा ह्यफुसका बारह्ण ठरला आहे.

*शासन परिपत्रकाचे होते उल्लंघन

बुलडाणा जिल्ह्यात सुमारे २५0 ते ३00 बिअर बार, हॉटेल आणि देशी-विदेशी चिल्लर दारू विक्रीची दुकाने आहेत. यापैकी सुमारे ८९ दारु दुकाने व बिअर बार असे आहेत की, त्यांनी शासन परिपत्रकाचे उल्लंघन केले आहे. राष्ट्रीय महामार्गापासून ७५ मीटर तर राज्य मार्गापासून ५0 मीटर दूर बार व देशी, विदेशी दारू विक्रीची दुकाने असावीत, असा नियम असतानाही या नियमाचे पालन केलेले नाही. यामध्ये देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने नगरपालिका क्षेत्रात नियमबाह्य ३ आहेत, विदेशी चिल्लर दारू विक्रीची गावठाणमध्ये ४२, नगरपालिका क्षेत्रात २४, देशी दारूचे चिल्लर विक्री दुकान गावठाणमध्ये ११ तर पालिका क्षेत्रात सहा आणि बिअर बार व हॉटेल गावठाणमध्ये निरंक तर पालिका क्षेत्रात पाच नियमबाह्य आहेत, असा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली.

Web Title: 8 9 times and liquor shops out of the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.