पोलीस पाटलांची ७४ पदे रिक्त
By Admin | Updated: April 8, 2015 01:53 IST2015-04-08T01:53:51+5:302015-04-08T01:53:51+5:30
खामगाव उपविभाग ; प्रभारी चालतो पोलीस पाटलाचा कारभार.

पोलीस पाटलांची ७४ पदे रिक्त
खामगाव (जि. बुलडाणा): उपविभागात पोलीस पाटलांची १८८ पदे मंजूर असताना सद्य:स्थितीत ११४ गावातच पोलीस पाटील कायमस्वरूपी कार्यरत आहे. खामगाव तालुक्यातील ५३ तर शेगाव तालुक्यातील २१ ठिकाणी पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. या रिक्त गावातील कामकाज प्रभारी चालत आहे. प्रशासन व गावातील नागरिकांचा दुवा म्हणून प्रत्येक गावात पोलीस पाटलाची नियुक्ती शासनाकडून करण्यात येते. गावातील नागरिकांना शैक्षणिक तसेच विविध शासकीय कामकाज, दाखल्यासाठी पोलीस पाटलाची गरज आहे. वर्षभरात सण, उत्सव व मिरवणुकीमध्ये पोलीस पाटलाची महत्त्वची जबाबदारी आहे. अलीकडच्या काळात राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत पोलीस पाटलांची भूमिका वाखाणण्यासारखी राहिली आहे. पोलीस प्रशासनाला गाव तंटामुक्त करण्यासाठी पोलीस पाटलांचे सहकार्य मिळाले आहे. आज जिल्हय़ातील प्रत्येक गाव तंटामुक्त घोषित झाले आहे. पोलीस पाटलाच्या पदाबाबत तंटामुक्त अभियानामुळे प्रकाशझोतात आली आहेत. खामगाव उपविभागात पोलीस पाटलाची १८८ पदे आहेत. यामध्ये खामगाव तालुक्यातील कोलोरी, शेलोडी, आवार, गारडगाव बु., कुर्हा, माथणी, नागापूर, माक्ता, जळका तेली, देऊळखेड, अडगाव, लोणी गुरव, सुटाळा बु., सजनपुरी, वाडी, जयपूर लांडे, घाणेगाव, राहुड, कुंबेफळ, भंडारी, जळका भडंग, हिवरा बु., निमकवळा, तांदुळवाडी, बोरजवळा, चिंचपूर, किन्ही महादेव, कंचनपूर, गवंढाळा, पिंप्री कोरडे, नायदेवी, दधम, कोन्टी, गेरु, दुधा, निरोड, निमखेड, बोथा फॉरेस्ट, पिंप्री धनगर, नांद्री, मांडणी, जयरामगड, सुजातपूर, अकोली, हिंगणा उमरा, उमरा लासुरा, दोंदवाडा, खोलखेड, रोहणा, कंझारा व बोथाकाजी या ५३ गावात पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. शेगाव तालुक्यातील चिंचोली, गव्हाण, जवळा बु., भोनगाव, येऊलखेड, गौलखेड, लासुरा खुर्द, गोळेगाव खुर्द, गावगाव खुर्द, घुई, कनारखेड, टाकळी नागझरी, खेर्डा, मच्छींद्रखेड, सगोडा, वरध, टाकळी हाट, चिंचखेड नवी वस्ती, कठोरा, सांगवा, तरोडा कसबा या गावातील पदे मयत अथवा सेवानवृत्तीमुळे रिक्त झाली आहेत. गेल्या काही दिवसात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्याने पोलीस पाटलाची रिक्त पदे भरणे गरजेचे झाले आहे.