माेताळा तालुक्यात ७३.६६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:29 IST2021-01-17T04:29:39+5:302021-01-17T04:29:39+5:30

माेताळा तालुक्यात मतदानासाठी युवकासह वृद्धांमध्येही उत्साह हाेता. सकाळच्या सत्रात गर्दी कमी हाेती. त्यानंतर मतदारांची गर्दी वाढत गेल्याने मतदानाची टक्केवारी ...

73.66 per cent polling in Maetala taluka | माेताळा तालुक्यात ७३.६६ टक्के मतदान

माेताळा तालुक्यात ७३.६६ टक्के मतदान

माेताळा तालुक्यात मतदानासाठी युवकासह वृद्धांमध्येही उत्साह हाेता. सकाळच्या सत्रात गर्दी कमी हाेती. त्यानंतर मतदारांची गर्दी वाढत गेल्याने मतदानाची टक्केवारी वाढली.

धामणगाव बढे येथे ७१.८६ टक्के मतदान

धामणगाव बढे : १५ जानेवारी रोजी पार पडलेल्याा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण आठ हजार ५१६ मतदारांपैकी ६१२० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची एकूण टक्केवारी ७०.८६ टक्के आहे.

यापैकी वाॅर्ड क्रमांक एकमध्ये एकूण १५६९ मतदारांपैकी ११८४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. वाॅर्ड क्रमांक दोन मध्ये १५०८ मतदारांपैकी १०८१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच वाॅर्ड क्रमांक ३ मध्ये १०१६ मतदारांपैकी ७२९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. वाॅर्ड क्र. ४ मध्ये १५२४ मतदारांपैकी १०८९ मतदारांनी मतदान केले. वाॅर्ड क्रमांक पाचमध्ये १४४१ मतदारांपैकी एक हजार ५६ मतदारांनी, तर वाॅर्ड क्रमांक सहामध्ये १४५८ मतदारांपैकी ९८१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. असा एकूण ८ हजार ५१६ मतदारांपैकी ६१२० मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग नोंदविला. मतदान प्रक्रियेच्या वेळेस गावामध्ये उत्साहाचे वातावरण होते. पोलीस प्रशासन यावेळेस चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

Web Title: 73.66 per cent polling in Maetala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.