६८ गावांमध्ये ‘महिला राज’!
By Admin | Updated: September 10, 2015 02:12 IST2015-09-10T02:12:18+5:302015-09-10T02:12:18+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील सरपंचपदाची निवडणूक शांततेत.

६८ गावांमध्ये ‘महिला राज’!
बुलडाणा (जि. बुलडाणा) : जिल्ह्यातील २८८ ग्रामंपचायतींचे सरपंच व उपसंरपचांची निवडणूक बुधवार, ९ सप्टेबर रोजी शांततेत पार पडली. मोताळा तालुक्यातील टाकळी घडेकर येथे सरपंचपदासाठी दोन्ही उमेदवारांना समान मते पडली. चिठ्ठी टाकून सरपंच निवडण्याची प्रक्रिया येथे सुरू असताना सदस्यांनी विरोध केला. त्यामुळे निवडणूक स्थगित करण्यात आली. ग्रामीण भागातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या सरपंच, उपसरपंच पदाच्या या निवडणुका अत्यंत अटीतटीच्या झाल्या. काही ठिकाणी अविरोध, तर काही ठिकाणी अटीतटीचा सामना करावा लागला. मेहकर, बुलडाणा, मोताळा आणि लोणार तालुक्यांतील ६८ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान झाल्या. २८८ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुका बुधवारी पार पडल्या. त्यापैकी बुलडाणा तालुक्यात २५ पैकी २0 ठिकाणी महिला सरपंच झाल्या. मोताळा तालुक्यात २७ पैकी १८, मेहकर तालुक्यात १८, तर लोणार तालुक्यात १२ ठिकाणी सरपंचपद महिलांकडे गेले. काही अपवाद वगळता जिल्ह्यात सरपंचपदाच्या निवडणुका शांततेत पार पडल्या.