नवीन वर्षात तब्बल ६७ विवाहमुहूर्त

By Admin | Updated: December 8, 2014 23:50 IST2014-12-08T23:50:50+5:302014-12-08T23:50:50+5:30

यंदा कर्तव्य आहे, विवाहोत्सुकांसाठी खूशखबर.

67 weddings in the new year | नवीन वर्षात तब्बल ६७ विवाहमुहूर्त

नवीन वर्षात तब्बल ६७ विवाहमुहूर्त

बुलडाणा : लग्न म्हटले की, स्वप्नाचे इमले मनात तयार होऊ लागतात; पण त्यासाठी आधी पासूनच तयारी करावी लागते. त्याची सुरूवात होते ती लग्नाच्या मुहूर्तापासून. मुहूर्त सापडला की, लग्नाची पुढील तयारी सुरू होते. या लग्नसराईमध्ये बाशींग बांधून तयार असणार्‍या जोडप्यासाठी खूशखबर आहे. डिसेंबर २0१४ पासून २0१५ पयर्ंत मुहूर्तांचे अर्धशतक उपलब्ध असल्याचे ज्यो ितष अभ्यासक सांगतात. येणार्‍या नव्या वर्षात लग्नासाठी तब्बल ६७ दिवसांचा मुहूर्त पंचांगात देण्यात आला आहे.
चालू डिसेंबरमध्ये १२, १५, १६, १७ आणि १८, तर जानेवारी २0१५ मध्ये २४, २५, २६, २९ असे चार दिवस मुहूर्त आहेत. फेब्रुवारीमध्ये ७, ते १३ ाणि १५ तारखेला मुहुर्त आहेत. मार्च महिण्यात ४, ७, ९, १0, १२ आणि १७ तारखेला मुहुर्त आहे. एप्रिल महीण्यात २१, २७, २८, आणि ३0 एप्रिल तर, मे मध्ये २, ५ ते ९, ११, १५, २0, २७, २८, आणि ३0 तारीख.तर, शेवटी जून महिण्यात २, ४, ६, ७, ११, १२ तारखेला लग्न मुहुर्त आहेत. यानंतर थेट नोव्हेंबरपयर्ंत अधिक मास आणि आषाढ असल्यामुळे लग्नतिथी नाही. २0१५ च्या शेवटच्या दोन महिण्यात तब्बल १६ मुहुर्त आहेत.

Web Title: 67 weddings in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.