६४ प्रकरणे प्रलंबित
By Admin | Updated: February 28, 2015 01:06 IST2015-02-28T01:06:51+5:302015-02-28T01:06:51+5:30
सिंदखेडराजा येथील भूमिअभिलेख कार्यालयास रिक्त पदांचे ग्रहण.

६४ प्रकरणे प्रलंबित
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : येथील भूमिअभिलेख कार्यालयात ७ पदे रिक्त असून, नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील भूमिअभिलेख कार्यालयामध्ये जानेवारी २0१५ पासून सुमारे ६४ प्रकरणे प्रलंबीत आहेत. तालुक्यामध्ये ११४ गावे असून, या गावांचा कारभार येथील भूमिअभिलेख कार्यालयावर आहे. या भूमिअभिलेख कार्यालयांतर्गत शेतीची मोजणी, जागेची मोजणी, क्षेत्रफळ निश्चीत करणे आदी प्रकारचे कामे केली जातात. ही सर्व कामे सध्या ई मोजणी अज्ञावली कार्यप्रणालीप्रमाणे सुरु आहे. यामुळे अर्जदारांना योजनेची तारीख व मोजणीदाराचे नाव याची पोच त्वरीत मिळते. परंतु येथील भूमि अभिलेख कार्यालयात कर्मचारी कमी असल्यामुळे अनेक शेतकर्यांची कामे खोळंबली आहेत. या कार्यालयात १३ पदे मंजूर आहेत. परंतु उपअभिक्षकासह ७ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये उ पअधिक्षकाचे एक पद, सिरस्तेदार, परिनिरिक्षक भुमापक आदींची पदे रिक्त आहेत. तर अभिलेखापालपदी असलेल्या एका कर्मचार्याला नांदुरा येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सध्या भुमापक २, दुरुस्ती लिपीक १, छानणी लिपीक १, कनिष्ठ लिपीक १ व प्रतिलिपीक १ अशा ६ कर्मचार्यांवर तालुक्याचा कारभार आहे. या रिक्त पदांमुळे जवळपास ६४ प्रकरणे प्रलंबीत आहेत. येथे कार्यरत कर्मचार्यांसुद्धा कामाचा अतिरिक्त भार आहे. सिंदखेडराजा, देऊळगावराजा व लोणार तालुक्याचा अतिरिक्त पदभार उपअधिक्षक एस.एस.कडू हेच सांभाळतात. कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण लागल्याने नागरिकांना विविध कामासाठी या कार्यालयाच्या पायर्या झिजवाव्या लागत आहेत. यासंदर्भात भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक एस.एस.कडू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भूमिअभिलेख कार्यालयातील रिक््त पदाची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना वेळोवेळी देण्यात आली असल्याचे सांगीतले. मार्च २0१५ पासून ई फेरफार योजना अंमलात येणार आहे. त्यामुळे अधिक सोयीचे होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.