६२ हजारांचा गुटखा जप्त

By Admin | Updated: May 11, 2017 07:06 IST2017-05-11T07:06:00+5:302017-05-11T07:06:00+5:30

६२ हजार २५० रुपयांचा गुटखा जप्त करून एका आरोपीस अटक केली.

62 thousand gutka seized | ६२ हजारांचा गुटखा जप्त

६२ हजारांचा गुटखा जप्त

बुलडाणा : बुलडाणा- चिखली रस्त्यावर स्थानिक गुन्हा शाखेने रचलेल्या सापळ्यात ६२ हजार २५० रुपयांचा गुटखा जप्त करून एका आरोपीस अटक केली.
स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणाचे पो.नि. प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांनी आरोपी शे. आरिफ शे. हाशम (वय २९) रा. अमडापूर यास नाकाबंदी करून चिखली ते बुलडाणा रोडवर पकडले. शे. आरिफ शे. हाशम हा दुचाकी क्र.एम.एच.२८ ए के ३२३० ने चिखलीवरून बुलडाणाकडे येत होता. त्याला अटक करून त्याच्याकडून एकूण ६२ हजार २५० रु. चा मुद्देमाल जप्त केला.
या कार्यवाहीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एम.एम.सय्यद, पोलीस हेड कॉन्स्टेबल अताउल्ला खान, पो.ना. नंदकिशोर धांडे, दीपक पवार, पोकॉ संदीप मोरे, नदीम शेख, विवेक तायडे यांनी पकडून पुढील कार्यवाहीसाठी आरोपीस मुद्देमालासह बुलडाणा अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे यांच्या ताब्यात दिले.

Web Title: 62 thousand gutka seized