६0 कट्टे तांदूळ पकडला!
By Admin | Updated: August 18, 2016 00:52 IST2016-08-18T00:52:24+5:302016-08-18T00:52:24+5:30
मालेगाव तहसीलच्या पथकाने पकडला धान्याचा साठा.

६0 कट्टे तांदूळ पकडला!
डोणगाव (जि. बुलडाणा), दि. १७: डोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या राज्य महामार्गावरील अंजनी बु. जवळ मालेगाव तहसीलचे नायब तहसीलदार यांनी मालेगाववरून जाणारा ६0 कट्टे तांदूळ १७ ऑगस्ट रोजी ५.३0 वाजेदरम्यान पकडला.
मालेगाव जि.वाशिम येथील एका कृषी केंद्रावरून रेशनचा तांदूळ जात असल्याची गुप्त माहिती मालेगावचे नायब तहसीलदार ए.एफ.सय्यद यांना मिळाली. त्यांनी मंडळाधिकारी डी.एन. केंद्रे, डी.एम. आवटे, घुगे, चौके यांना सोबत घेऊन टाटा गाडी क्र. एम.एच.३८ ई.२१0८ चा पाठलाग करून अंजनी बु. जवळ गाडी पकडली. त्यामध्ये तांदळाचे ६0 कट्टे आढळून आल्याने सदर गाडी पोलीस स्टेशन डोणगावला लावण्यात आली. ही माहिती कळताच तहसीलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार काळे यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली. मालासह गाडी जप्त करण्यात आली असून, माल मालेगाव येथील धीरज भांगडिया यांचा असल्याचे वृत्त आहे.