अवैध गौण खनिजातून ६0 लाखांचा महसूल
By Admin | Updated: February 18, 2015 01:06 IST2015-02-18T01:06:46+5:302015-02-18T01:06:46+5:30
बुलडाणा जिल्ह्यात नऊ महिन्यात ९00 कारवाया.
अवैध गौण खनिजातून ६0 लाखांचा महसूल
बुलडाणा : रेती, मुरूम, गिट्टी, माती आदी विविध प्रकारचे गौण खनिज वापरण्यासाठी शासनाने बंदी घातल्यामुळे गौण खनिजाच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. मागील नऊ महिन्यात अवैध गौण खनिज चोरी करताना रंगेहाथ पकडून संबंधित चोरट्यांविरूद्ध करवाई करुन दंड आकारण्यात आला. यातून ६0 लाख २३ हजार रुपयाचा महसूल गोळा करण्यात आला. सर्वाधिक कारवाया बुलडाणा, शेगाव, जळगाव जमोद तालुक्यात करण्यात आल्या आहेत अशी माहिती मंगळवारी गौण खनिज अधिकारी दिनेश गिते यांनी लोकमत ला दिली.
जिल्ह्यातून सध्या मोठय़ा प्रमाणात वाळू व इतर गौण खनिजाची वाहतूक होत आहे. यामध्ये अवैध वाळू वाहतूकीचे प्रमाण सर्वाधिक आहे, तसेच डबर, मुरूम व लाल मातीची अवैधपणे उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गत नऊ महिन्यात महसूल विभागाच्यावतीने जिल्हाभरात ८0५ कारवाया झाल्या आहे. जिल्ह्याबाहेर वाळूला चांगला दर असल्यामुळे जिल्ह्यातील वाळू याठिकाणी विक्रीसाठी पाठविली जाते.लाल मातीचेही उत्खनन होते. यामध्ये अनेक वेळा परवानगी चार ते पाच ट्रकची घेतली जाते व प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त उत्खनन केली जाते.यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. या सर्वांवर अंकुश बसावा व गौण खनिजातून मिळणारा महसूल वाढावा, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात तहसिलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या पथकाडून गौण खनिज माफियांवर कारवाई केली जाते. गत १ एप्रिल २0१४ ते ३१ जानेवारी २0१५ अश्या नऊ महिण्यात जिल्हाभरात ८0५ करवाया करण्यात आल्या. यातून जिल्हा प्रशासनाकडे ५३ लाख २३ हजार रुपयाचा महसूल गोळा करण्यात आला.