खामगावातील महामार्ग चौपदरीकरणासाठी ६0 कोटी!
By Admin | Updated: October 1, 2015 00:15 IST2015-10-01T00:15:02+5:302015-10-01T00:15:02+5:30
भाऊसाहेब फुंडकरांनी घेतला पुढाकार.

खामगावातील महामार्ग चौपदरीकरणासाठी ६0 कोटी!
खामगाव : शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री ना.नितीन गडकरी यांचे यांचे हस्ते त्याचे भूमीपूजन होत आहे. शहरातील वाहतूकीचा कळीचा मुद्दा बनलेल्या या मार्गाच्या चौपदीकरणासाठी आमदार पांडुरंग फुंडकर व आमदार आकाश फुंडकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शहरातून बाळापुर नाका ते नगर पालिका, न्यायालय ते सुटाळा बु., एमआयडीपर्यंंत नांदुरा रोड हा जुना राष्ट्रीय महामार्ग आहे. याच मार्गावर शहरातील महत्त्वाची शासकीय कार्यालये, रुग्णालये, शाळा महाविद्यालये, न्यायालय आहे. त्यामुळे शहरातील संपूर्ण वाहतूक याच मार्गावर केंद्रीभूत झालेली आहे. रस्ता छोटा व वाहनांची संख्या अधिक अशी या रस्त्याची स्थिती आहे. त्यामुळे या मार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. आ.अँड.फुंडकर यांनी या महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री ना.नितीन गडकरींची नागपूर तर आ. भाऊसाहेब फुंडकर यांचे समवेत दिल्लीलाही भेट घेतली होती. त्यानुषंगाने अमरावती विभागाच्या अधिकार्यांनी महामार्गाची पाहणी करून आराखडा तयार केला होता. परिवहन मंत्रालयाकडून या कामासाठी ६0 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामाच्या मंजुरीचे पत्र राष्ट्रीय महामार्ग क्षेत्रीय अधिकारी यांना महाराष्ट्र टेक्नीकल डिव्हीजनचे जनरल मॅनेजर आशिष ससाणी यांनी पाठविले आहे.