जिल्ह्यात ६ पॉझिटिव्ह, तीन जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:39 IST2021-08-12T04:39:05+5:302021-08-12T04:39:05+5:30

पॉझिटिव्ह अहवालांपैकी चिखली शहरातील पुंडलिक नगरमधील एक, चिखली तालुक्यातील भालगाव येथील एक, मेहकर एक, बुलडाणा एक, सिंदखेड राजा एक, ...

6 positive in the district, 3 defeated Corona | जिल्ह्यात ६ पॉझिटिव्ह, तीन जणांची कोरोनावर मात

जिल्ह्यात ६ पॉझिटिव्ह, तीन जणांची कोरोनावर मात

पॉझिटिव्ह अहवालांपैकी चिखली शहरातील पुंडलिक नगरमधील एक, चिखली तालुक्यातील भालगाव येथील एक, मेहकर एक, बुलडाणा एक, सिंदखेड राजा एक, देऊळगावराजा तालुक्यातील गिरोली बुद्रुक येथील एकाचा समावेश आहे. दरम्यान, तीन जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत ६ लाख ५६ हजार १९८ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच ८६ हजार ६०३ कोरोना बाधितांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे.

--१,७७३ अहवालांची प्रतीक्षा--

तपासणीसाठी घेण्यात आलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैकी १ हजार ७७३ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोराेना बाधितांची संख्या आता ८७ हजार ३३८ झाली आहे. यापैकी ६३ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ६७२ कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे.

Web Title: 6 positive in the district, 3 defeated Corona