आणखी ६ पाॅझिटिव्ह, ८ जणांची काेराेनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:40 IST2021-09-14T04:40:25+5:302021-09-14T04:40:25+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून साेमवारी आणखी ६ पाॅझिटिव्ह आढळले आहेत, तसेच ...

आणखी ६ पाॅझिटिव्ह, ८ जणांची काेराेनावर मात
बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून साेमवारी आणखी ६ पाॅझिटिव्ह आढळले आहेत, तसेच ८ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ४६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत़
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४८० अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४७४ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ६ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये परजिल्हा तोगलाबाद, ता. दर्यापूर, जि. अमरावती येथील ४, बुलडाणा तालुका डोमरुळ १, नांदुरा शहरातील एकाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत ७ लाख ४ हजार ८४३ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आज रोजी ७६९ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत.
६७३ बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात आजअखेर एकूण ८७ हजार ५३० कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ८६ हजार ८११ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोविडचे ४६ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत, तसेच आजपर्यंत ६७३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.