मायलेकाच्या आत्महत्येप्रकरणी ६ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:34 IST2021-03-21T04:34:05+5:302021-03-21T04:34:05+5:30
रुपाली हरिदास चव्हाण या महिलेने तिच्या सात वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. १९ मार्च ...

मायलेकाच्या आत्महत्येप्रकरणी ६ जणांवर गुन्हा
रुपाली हरिदास चव्हाण या महिलेने तिच्या सात वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. १९ मार्च रोजी त्यांचे मृतदेह तरंगताना दिसून आले होते. या प्रकरणी १९ मार्च रोजी मृत रुपालीचे वडील शिवशंकर वाघमारे (५०, रा. मेरा) यांनी बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात प्रकरणी तक्रार दिली. माहेराहून पैसे आणावे या मागणसाठी रुपालीचा सासरी छळ केला जात होता. सततच्या त्रासाला कंटाळून रुपालीने मुलगा समर्थसह आत्महत्या केली असले किंवा सासरच्या व्यक्तींनी तिचा घातपात केला असावा असा संशय वाघमारे यांनी तक्रीरीमध्ये व्यक्त केला आहे. प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती हरीदास चव्हाण, सासरा अर्जून चव्हाण, सासू विमल चव्हाण, दीर गजानन चव्हाण, स्वाती गजानन चव्हाण, प्रमीला चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंड्यासाठी छळ करणे व अन्य काही कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.