५७0८ कोटींच्या खर्चाला मंजुरी

By Admin | Updated: February 19, 2016 01:36 IST2016-02-19T01:36:07+5:302016-02-19T01:36:07+5:30

जिगाव सिंचन प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार.

5708 crores approved for expenditure | ५७0८ कोटींच्या खर्चाला मंजुरी

५७0८ कोटींच्या खर्चाला मंजुरी

मलकापूर (जि. बुलडाणा): हजारो हेक्टर शेतजमीन सिंचीत करणारा मलकापूर म तदार संघातील महत्त्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्पाच्या ५७0८ कोटी ११ लाख रुपयांच्या खर्चाला आमदार चैनसुख संचेती यांच्या प्रय त्नांमुळे राज्य शासनाकडून अंतिम स्वरूपाची मान्यता १२ फेब्रुवारी रोजी युद्धस्तरावर मिळाली आहे. शेतकर्‍यांना तरणोपाय ठरणारा हा जिगाव प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावा, यासाठी आमदार संचेती यांनी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्याकडून चालू २0१५- १६ या आर्थिक वर्षात याच प्रकल्पावर प्रथमदर्शनी ३१३ कोटी रुपये खर्च करण्यासाठी मंजूर करून घेतले आहेत. या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी ५0७८.११ कोटी रुपये खर्चाची मान्यता राज्य सरकारकडून मिळवणे अत्यावश्यक होते. त्यासाठी आमदार संचेती यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले व ही मान्यता मिळवून त्यांनी केंद्र शासनाच्या अखत्यारीमधील सेन्ट्रल वाटर कमिशन नवी दिल्लीचे विद्यमान अध्यक्ष जी. एस. झा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन उपरोक्त सिंचन प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारचे सहयोग व योगदान मिळावे म्हणून प्रकल्पाचे महत्त्व १५ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. महत्त्वाचे म्हणजे सिंचन प्रकल्पावर होणारा अंतिम खर्च याला राज्य वित्त विभागाची मान्यता मिळाल्याशिवाय प्रकल्पाला तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळत नाही, त्यामुळे राज्य वित्त विभागाची मान्यता तत्काळ मिळणे आवश्यक असते. तरच प्रकल्पाला केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होऊन प्रकल्पाला गति मिळते, ही बाब हेरुन आमदार संचेती यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून आधी राज्य वित्त विभागाची मान्यता मिळवली, ही मान्यता घेतल्यावर त्यांनी केंद्रीय जलआयोगाची शेवटच्या टप्प्याची मान्यता आयोगाचे अध्यक्ष जी.एस. झा यांच्याकडून मिळवली, त्यामुळे शेतकर्‍यांना नवसंजीवनी देऊन हरीत क्रांती उदयास आणणारा जिगाव प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी निश्‍चितपणे गती मिळाली आहे. एवढेच नव्हे तर प्रकल्पासाठी नवविभाग आणि पर्यावरण विभागाच्या अडचणी दूर व्हाव्या, तसेच वनविभागाची जमीन हस्तांतरणाच्या प्रस्तावालासुद्धा अंतिम मान्यता मिळावी, यासाठी पर्यावरण व वन मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडेसुद्धा आमदार संचेती यांनी प्रयत्न केला आहे.

Web Title: 5708 crores approved for expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.