१८ जागांसाठी ५७ उमेदवार

By Admin | Updated: May 5, 2015 00:11 IST2015-05-05T00:11:05+5:302015-05-05T00:11:05+5:30

लोणार कृषिउत्पन्न बाजार समिती निवडणूक; दखल २४५ नामनिर्देशपत्रांपैकी ३७ अर्ज अपात्र.

57 candidates for 18 seats | १८ जागांसाठी ५७ उमेदवार

१८ जागांसाठी ५७ उमेदवार

लोणार : कृषिउत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांकरिता १७ मे रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी नामनिर्देशपत्र दखल केलेल्या २४५ पैकी ३७ जणांचे अर्ज छाननीत अपात्र घोषित करण्यात आले आहेत. त्यानंतर उर्वरित २१0 पैकी १५३ जणांनी निवडणुकीच्या रणातून माघार घेतल्याने आता १८ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या रिंगणात ५७ उमेदवार आहेत. सहकार विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. भोईटे यांनी ही माहिती दिली. शेतकरीहिताचे निर्णय घेण्यासाठी स्थापन झालेल्या लोणार येथील कृषिउत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या १८ संचालकांच्या निवडणुकीसाठी येत्या १७ मे रोजी मतदान होणार आहे.

Web Title: 57 candidates for 18 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.