शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

५५४ कोटी रुपयांच्या कर्जाचे होणार पूनर्गठन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 15:53 IST

बुलडाणा: अवर्षणाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांकडील कर्जाच्या वसुलीस स्थिगिती देण्यात आलेली असून यंदा जवळपास ५५४ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे पूनर्गठन करावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अवर्षणाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांकडील कर्जाच्या वसुलीस स्थिगिती देण्यात आलेली असून यंदा जवळपास ५५४ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे पूनर्गठन करावे लागणार आहे. दरम्यान, इच्छूक शेतकर्यांना प्रथमत: बँकांकडे तसा अर्ज करावा लागणार आहे. दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत दोन लाख २८ हजार १४९ शेतकर्यांचे ९९८ कोटी रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.बुलडाणा जिल्ह्यातील आठ तालुक्यात दुष्काळ तर पाच तालुक्यात दृष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या हातून खरीपाचा हंगाम गेला आहे. अशा स्थितीत कर्ज वसुलीस २१ डिसेंबर २०१८ रोजीच जिल्ह्यातील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली होती तर दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पूनर्गठनाचे निर्देश देण्यात आले होते. पुणे येथील सहकारी संस्था कार्यालयातील कृषीपत विभागाचे उपनबिंधक डॉ. एस. एन.जाधव यांनी यासंदर्भात उपरोक्त आदेश निर्गमित केले होते. दरम्यान, प्रारंभी राज्यातील १८० तालुक्यात ट्रीगर २ लागू झाला होता. त्यानंतर दुष्काळी उपाययोजना करण्यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले होते.त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनानेही दुष्काळी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. दुष्काळी परिस्थिती द्यावयाच्या प्रमुख आठ सुविधांचा विचार करता खरीप हगांमातील कर्ज पूनर्गठन करण्यास प्राधान्य देण्यात आले होते.३१ मार्च २०१९ पर्यंत बाधीत गावातील जे शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकर्यांची संमती घेऊन खरीप हंगाम २०१८ मधील पीक कर्जाचे व्याजासह मध्यम मुदती कर्जात पाच वर्षाच्या कालावधीसाठी पूनर्गठन करण्याबात सुचीत करण्यात आले होते. सोबतच अशा शेतकर्यांना पुढील हंगामासाठीही पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्याही सुचना देण्यात आलेल्या होत्या.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँक