तिसऱ्या दिवशी ५५ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:33 IST2020-12-29T04:33:26+5:302020-12-29T04:33:26+5:30

तालुक्यातील ४३ ग्राम पंचायतीसाठी निवडणूक होत असून, आज सहाव्या दिवशी तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी उसळली होती ; परंतु उमेदवारी ...

55 applications filed on the third day | तिसऱ्या दिवशी ५५ अर्ज दाखल

तिसऱ्या दिवशी ५५ अर्ज दाखल

तालुक्यातील ४३ ग्राम पंचायतीसाठी निवडणूक होत असून, आज सहाव्या दिवशी तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी उसळली होती ; परंतु उमेदवारी अर्ज दाखल करताना त्रुटीची पूर्तता करता करता उमेदवारांची धावपळ पाहावयास मिळाली. २८ डिसेंबर राेजी दत्तापूर येथील ६ पुरुष आणि स्त्री राखीवसाठी ८ अर्ज दाखल झाले आहेत. सोनोशी येथून पुरुष ९ तर महिला राखीवसाठी ६ , सुलजगाव पुरुष २, स्त्री राखीव साठी १ , दुसरबीड महिला राखीव १ , पळसखेड चक्का महिला राखीवसाठी १ , देऊळगाव कोळ महिला राखीवसाठी २, कुंबेफळ पुरुष १ , शेंदुर्जन पुरुष १, महिला राखीव २ , हनवतखेड ( मलकापूर पांग्रा ) पुरुष ४, महिला राखीव साठी ५ , जागदरी पुरुष ३ , महिला १ , साखरखेर्डा पुरुष १ , उमनगाव १ असे एकूण ५५ अर्ज दाखल झाले आहेत .

Web Title: 55 applications filed on the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.