सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्या दोघांना ५४ हजारांचा दंड
By अनिल गवई | Updated: May 9, 2023 16:09 IST2023-05-09T16:08:48+5:302023-05-09T16:09:36+5:30
सुसाट वेगाने तसेच कर्णकर्कश आवाज करीत वाहन चालविणाऱ्या तिघांना शुक्रवारी रात्री खामगावात पकडण्यात आले.

सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्या दोघांना ५४ हजारांचा दंड
खामगाव: शहरात सुसाट वेगाने गाडी चालविताना शुक्रवारी रात्री तीन दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली. यापैकी दोन दुचाकी स्वारांना उपप्रादेशिक परिवहन विभागाने दंड ठोठावला आहे. यामध्ये एका बुलेट स्वाराला २५५०० रुपयांचा तर दुसऱ्या दुचाकी स्वाराला२८५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
दुचाकीच्या सायलेसंरमध्ये छेडछाड तसेच नंबरशी खाडाखोड करून सुसाट वेगाने दुचाकी चालविण्याच्या घटना अलिकडच्या काळात वाढीस लागल्या आहेत. सुसाट वेगाने तसेच कर्णकर्कश आवाज करीत वाहन चालविणाऱ्या तिघांना शुक्रवारी रात्री खामगावात पकडण्यात आले. त्यांची वाहने शहर पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आली. दरम्यान, एका बुलेट स्वारासह दुसऱ्या आधुनिक दुचाकी स्वाराच्या वाहनांची कागदपत्रे तपासणीसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन विभागाने दोन वाहन धारकांना दंड ठोठावला आहे. त्यामुळे शहरातील बेशिस्त वाहन धारकांना चांगलीच चपराक बसली आहे.