शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये ५३ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 11:49 IST

अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये एकुण मोठे आणि मध्यम २५ प्रकल्प आहेत.

जयदेव वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या, मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पामधील जलाशयाच्या पातळीमध्ये यावर्षी अद्याप फारशी वाढ झाली नाही. सध्यास्थितीत अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या मध्यम आणि लघु प्रकल्पात ५३.७१ टक्के एवढा जलसाठा उपलब्ध आहे.अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये एकुण मोठे आणि मध्यम २५ प्रकल्प आहेत. तर ४७७ लघु प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांमध्ये अमरावतीमधील उर्ध्व वर्धा, यवतमाळमधील पुस प्रकल्प, अरूणावली, बेंबळा, अकोलामधील काटेपूर्णा, वाण प्रकल्प तर बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी आणि खडकपुर्णा अशा ९ प्रकल्पांचा समावेश आहे. यावर्षी पावसाळा सुरू होवून दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला. मात्र कमी पावसाळ्यामुळे अद्याप एकही प्रकल्प १०० टक्के भरला नाही. तर या ९ मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी ६३.११ टक्के एवढा जलसाठ्याची नोंद आहे. वाशिम जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नाही. त्याचप्रमाणे या पाचही जिल्ह्यामध्ये एकुण २५ मध्यम प्रकल्प आहेत. यामध्ये अमरावती ५, यवतमाळ ७, अकोला ४, बुलडाणा ७, आणि वाशिम २ अशा मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. मोठ्या प्रकल्पांवर हजारो हेक्टर शेतीला सिंचनासाठी सुध्दा पाण्याचा उपयोग केला जाते. मागील वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे या प्रकल्पांमध्ये उन्हाळ्यातही पाण्याची पातळी टिकून होती. परंतु यावर्षी हे प्रकल्प १०० टक़्के भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. तसेच अनेक प्रकल्पांमधून पिण्याच्या पाण्याचा वापर केल्या जातो आधी प्रकल्पे १०० टक्के भरण्याची गरज आहे. त्यामध्ये अमरावती विभागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण