५२ जणांची काेराेनावर मात; पाच ‘पाॅझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:43 IST2020-12-30T04:43:46+5:302020-12-30T04:43:46+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संक्रमणाचा वेग मंदावल्याचे चित्र असून, मंगळवारी केवळ पाच जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे, तसेच ५२ ...

५२ जणांची काेराेनावर मात; पाच ‘पाॅझिटिव्ह’
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संक्रमणाचा वेग मंदावल्याचे चित्र असून, मंगळवारी केवळ पाच जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे, तसेच ५२ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. ४९३ काेराेना अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात सध्या २२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४९८ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४९३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ५ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपिड ॲन्टिजन टेस्टमधील ५ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४२१ तर रॅपिड टेस्टमधील ७२ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेले रुग्णांमध्ये दे. राजा शहरातील दाेन, जळगाव जामोद शहरातील दाेन, लोणार शहरातील एक संशयीत व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. काेराेनावर मात केल्याने शेगाव येथील १०, बुलडाणा अपंग विद्यालय ८, आयुर्वेद महाविद्यालय १, दे. राजा ५, खामगाव ५, नांदुरा ३, चिखली ११, मेहकर १, चिखली ६, जळगाव जामोद २ जणांना सुटी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत ८८ हजार ०१८ रिपाेर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १२ हजार ०६९ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे, तसेच १ हजार ३२७ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १२ हजार ४४१ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी १२ हजार ०६९ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात २२२ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तसेच आजपर्यंत १५० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.