जिल्ह्यातील ५१ हजार लोकांनी कोरोनाला हरवून दाखवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:31 IST2021-04-26T04:31:53+5:302021-04-26T04:31:53+5:30

त्यातच गेल्या वर्षीच्या तुलनेत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा जिल्ह्यात निर्माण झाल्या आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि गेल्या वर्षभरातील कोरोना संसर्गासंदर्भातील ...

51,000 people in the district defeated Corona | जिल्ह्यातील ५१ हजार लोकांनी कोरोनाला हरवून दाखवले

जिल्ह्यातील ५१ हजार लोकांनी कोरोनाला हरवून दाखवले

त्यातच गेल्या वर्षीच्या तुलनेत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा जिल्ह्यात निर्माण झाल्या आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि गेल्या वर्षभरातील कोरोना संसर्गासंदर्भातील वैद्यकीय अभ्यासातून निर्माण झालेली उपचार पद्धतीही प्रसंगी गंभीर रुग्णासही बरे करण्यास उपयुक्त ठरत आहे. कोरोनावर सहज मात करता येते. त्यामुळे एकदम घाबरून न जाता काळजी घ्या, वेळीच डॉक्टरांचाही घेतलेला सल्ला उपयुक्त ठरतो.

--

कोरोनाची लक्षणे जाणवताच डॉक्टरांचा सल्ला घेत चाचणी केली व स्कोअर जास्त असल्याने लगेच रुग्णालयात भरती झालो. वेळीच इलाज केल्याने लवकरच बरा झालो. कोरोनाला घाबरू नका, पण आवश्यक ती काळजी घेत कोरोनाविषयक नियमांचे पालन करा.

(अशोक जयसवाल, वय ६२, बुलडाणा)

--

प्रारंभी नेमके काय झाले समजले नाही. गंध व तोंडाची चव गेल्यावर कोरोना झाल्याचे लक्षात आले. त्वरित चाचणी केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार केले व बरी झाले. अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून घाबरू नका. हिंमत ठेवत आनंदी राहत कोरोनावर मात करता येते. नकारात्मक विचार बाजूला ठेवा.

(सोनाली पानट, बुलडाणा)

---

सकारात्मक विचार ठेवा. त्याद्वारे रोगप्रतिकारशक्तीच्या माध्यमातून कोरोनाला आपण हरवू शकतो. आनंदी राहा. लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्यांनी आयसोलेशनमध्ये असताना आपले जुने छंद जोपासा. त्यासाठी आपली दिनचर्या ठरवून घ्यावी. सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. वेळीच उपचार करून बरे झालेल्यांची अनेक उदाहरणे आहेत.

(विश्वास खर्चे, मानसोपचारतज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा)

--

जिल्ह्याची लोकसंख्या- २५ लाख ८० हजार

स्वॅब तपासणाऱ्यांची संख्या :- ४,०८,०५५

कोरोना निगेटिव्ह आलेल्यांची संख्या :- ३, ३५,३७७

कोरोना लागण झालेल्यांची संख्या :- ५९,०७९

कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या :-५१,४१५

सध्या उपचार सुरू असलेले :- ७,२९१

--जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट झाला कमी--

जिल्ह्याचा मधल्या काळात सरासरी १६ च्या आसपास असलेला पॉझिटिव्हिटी रेट आता कमी झाला आहे. सध्या तो १४ टक्क्यांवर आला आहे.

Web Title: 51,000 people in the district defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.