मुंडे यांच्या स्मारकासाठी ५१ लाखाची निधी
By Admin | Updated: August 26, 2014 23:38 IST2014-08-26T23:14:20+5:302014-08-26T23:38:45+5:30
जागदरी येथे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंढे यांचे स्मारकासाठी खासदार निधीतून ५१ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा

मुंडे यांच्या स्मारकासाठी ५१ लाखाची निधी
सिंदखेडराजा : जागदरी येथे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंढे यांचे स्मारक व्हावे, ही कल्पना ग्रामस्थांनी मांडली होती. त्या स्मारकासाठी खासदार निधीतून ५१ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा खा.प्रतापराव जाधव यांनी जागदरी येथे केली.
तालुक्यातील जागदरी येथे आराध्य दैवत असलेल्या संत श्री शंकरबाबा यांच्या संस्थानच्या परिसरात लोकनेते स्व.गोपीनाथ मुंढे यांचे स्मारक व्हावे, हा प्रस्ताव शंकरराव उगलमुगले यांनी ग्रामस्थांसमोर मांडला होता. त्या प्रस्तावाला एकमुखी पाठींबा देण्यात आला होता. त्या स्मारकाच्या माध्यमातून जिल्ह्यातच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रात स्व.गोपीनाथ मुंढे यांची ओळख निर्माण होणार असून, त्यांच्या स्मृतींना उजाळा दिल्या जाणार आहे. या स्मारकाच्या नियोजन बैठकीला सरपंच सौ.वर्षाताई उगलमुगले, शिवसेना नेते दिलीप वाघ, तालुकाप्रमुख दादाराव खार्डे, आत्माराम कायंदे, राम भालेराव, हभप वाघ गुरुजी, डॉ.शिवाजी खरात उपस्थित होते. समाज सक्षम करण्याचे काम धार्मिक स्थळावरुन होते. मुंढे यांच्या जाण्याने समाजाची आणि महाराष्ट्राची विपरीत हानी झाली आहे. त्यांच्या स्मृती जागृत रहाव्यात यासाठीच स्मारकाचा निर्णय हा येणार्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. स्मारकाचे काम पंकजाताई मुंढे यांच्या पुढाकाराने सुरु केले जाणार असल्याची माहिती खा.जाधव यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ.सुभाष जायभाये यांनी केले. यावेळी भानुदास जायभाये, अशोक उगलमुगले, रमेश उगलमुगले, डॉ. अनिल उगलमुगले, संजय उगलमुगले, शिवानंद जायभाये, धोंडूजी सांगळे उपस्थित होते.