सोयाबीनचे ५0 टक्के नुकसान
By Admin | Updated: September 21, 2014 00:44 IST2014-09-21T00:44:22+5:302014-09-21T00:44:43+5:30
वांझोट्या सोयाबीन वानामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी अडचणीत.

सोयाबीनचे ५0 टक्के नुकसान
ब्रम्हानंद जाधव /मेहकर (बुलडाणा)
पश्चिम व-हाडात ह्यलखपतीह्ण वाणाच्या सोयाबीन पिकाला फळधारणा झाली नसल्याने ५0 टक्के शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. तर उर्वरित सोयाबीनच्या इतर वाणावरही किडी व रोगांचा मारा वाढल्यामुळे शेतात असलेली सोयाबीनची उभी झाडे वाळत आहेत. ऐनकेनप्रकारे शेतकर्यांना ह्यलख पतीह्ण वाणाच्या सोयाबीनने कंगाल केले आहे.
अकोला, बुलडाणा आणि वाशिम या पश्चिम वर्हाडातील तीन जिल्ह्यात शेतकर्यांनी गत १0 वषार्ंपासून सोयाबीन पिकाला मोठय़ा प्रमाणात पसंती दिली आहे. दरवर्षी साधारणत: मृग नक्षत्रात पाऊस येऊन साधारणत: १५ ते २0 जून दरम्यान पेरणीला सुरुवात होत असते; मात्र यंदा मोसमी पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या उशिरा झाल्या. पश्चिम वर्हाडात यावर्षी सुमारे ८ लाख ३७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. यामध्ये प्रारंभी सोयाबीन बियाण्याची मोठी परवड झाली. यात जवळपास ५0 टक्के सोयाबीन उत्पादक शेतकर्यांनी भरघोस उत्पन्नाच्या आशेपोटी ह्यलखपतीह्ण या वाणाची पेरणी केली; परंतु सोयाबीनचे ह्यलखपतीह्ण वाणाचे बियाणे ह्यनॉनफर्टाईलह्ण निघाल्याने शेतकर्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. तसेच मध्यंतरी सोयाबीन िपकाला अपुर्या पावसाचा फटका बसला. त्या पाठोपाठ सोयाबीन पिकावर ह्यस्पोडोप्टेरा लिट्यूराह्ण या भयावह किडीचे आक्रमण झाले; तसेच शेंगांना फळधारणेपूर्वीच करपा, यलो मोझ्ॉक यासारख्या बुरशीजन्य रोगानेही ग्रासले. यामुळे सोयाबीन पीक धोक्यात सापडले असून, शेतकरी वर्गाची चिंताही वाढली आहे.