बुलडाणा जिल्ह्यात भाजपासाठी ५0 दावेदार

By Admin | Updated: August 4, 2014 00:15 IST2014-08-03T23:55:13+5:302014-08-04T00:15:27+5:30

विधानसभा निवडणूक : पक्ष निरीक्षकांनी घेतल्या मुलाखती

50 contenders for BJP in Buldhana district | बुलडाणा जिल्ह्यात भाजपासाठी ५0 दावेदार

बुलडाणा जिल्ह्यात भाजपासाठी ५0 दावेदार

बुलडाणा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने अधिकृतरित्या प्रक्रिया सुरू केली आहे. भाजपाचे पक्ष निरीक्षक तथा प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन तसेच सहाय्यक निरीक्षक डॉ.भागवत कराड यांनी आज ३ ऑगस्ट रोजी येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघाकरीता ५0 दावेदार समोर आले आहे. युतीमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदार संघ भाजपाकडे असून ३ विधानसभा मतदार संघ शिवसेनेकडे आहे. तरीही ७ मतदार संघासाठी इच्छूक दावेदारांनी मुलाखती दिल्या. प्रारंभी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ.संजय कुटे, आमदार चैनसुख संचेती, आमदार भाऊसाहेब फुंडकर यांनी पक्ष निरीक्षक गिरीश महाजन, डॉ. भागवत कराड यांचे स्वागत केले. त्यानंतर १२ वाजता विधानसभा क्षेत्र निहाय मुलाखतीला सुरूवात झाली. प्रारंभी मेहकर मतदार संघासाठी एकही दावेदार समोर न आल्यामुळे सिंदखेड राजा विधानसभेसाठी मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी विविध मतदार संघासाठी एकूण ५0 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यात सिंदखेड राजा मतदार संघासाठी डॉ.गणेश मांटे, शिवाजी खरात, वामनराव आढाव, गबाजी कुटे, ज्ञानोबा मुंढे, डॉ.राजेंद्र वाघ, भगवान नागरे, विठोबा मुंढे, प्रभाकर ताठे, युवराज नागरे, कारभारी सानप, मधुकर सोनुने, डॉ.भगवान झंवर या १३ इच्छुकांचा समावेश आहे. चिखलीसाठी संजय चेके पाटील, सुरेशअप्पा कबुतरे, विजय कोठारी, देविदास जाधव, श्रीराम सपकाळ, दिपक वारे, शाम पठाडे, दत्ता पाटील, जगदेवराव बाहेकर, सौ.श्‍वेता महाले, एकनाथ जाधव, सौ.आशाताई घाडगे, सौ.शकुंतला बाहेकर, प्रकाशबुवा जवंजाळ या १४ इच्छुकांचा समोवश आहे. मेहकरसाठी प्रा.विष्णु जोगदंड यांनी दावा केला आहे. जळगाव जामोदसाठी आमदार डॉ.सजंय कुटे, सुनिल भगत, प्रकाश ढोकणे, अजय वानखेडे व ज्ञानेश्‍वर करांगळे या ५ इच्छुकांचा समावेश आहे. खामगाव विधानसभासाठी आकाश फुंडकर, प्रल्हाद बगाडे, संजय ठाकरे, सारंगसिंग चव्हाण, अमोल अंधारे, संतोष डिडवाणी या ६ इच्छुकांनी दावा केला. मलकापूरसाठी आमदार चैनसुख संचेती, शाम राखोंडे, अनिल शिंगोटे, रामधन वानखेडे या ४ इच्छूकांनी दावा केला आहे तर बुलडाणा विधानसभा मतदार संघासाठी उदय देशपांडे, भगवान एकडे, जनदेवराव बाहेकर, प्रमोद कळसकर, पंडितराव सपकाळ, प्रा.प्रभाकर वारे व जवरे पाटील यांनी मुलाखती दिल्या. ** चिखलीत १४ तर मेहकरमध्ये फक्त १ दावा चिखली मतदारसंघासाठी सर्वात जास्त १४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्यात ३ महिला इच्छुक उमेदवांचा समावेश होता. तर मेहकर विधानसभेसाठी १ दावेदार समोर आला. यावेळी महायुतीत भाजपाच्या ४ मतदार संघाशिवाय मेहकर मतदार संघाचा दावा करणार असल्याचे यापूर्वी भाजपा नेत्यांनी जाहीर केले होते. तरीही मेहकर मतदार संघातून फक्त १ दावेदार समोर आला आहे.

Web Title: 50 contenders for BJP in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.