पिशवी हिसकावून पाच लाख रुपये लंपास
By Admin | Updated: December 29, 2015 01:58 IST2015-12-29T01:58:08+5:302015-12-29T01:58:08+5:30
मेहकर येथील घटना.

पिशवी हिसकावून पाच लाख रुपये लंपास
मेहकर : दिवसभराचा व्यवसाय करून घरी जात असताना एका किराणा दुकानदाराच्या हातातील थैली तीक्ष्ण हत्याराने कापून अंदाजे पाच लाख रुपये अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना रविवारी रात्री इमामवाडा चौक परिसरात घडली. यासंदर्भात हकीकत अशी की, स्थानिक मस्तान चौकात रजवी किराणा दुकानचे संचालक हबीब मापारा व त्यांचा भाचा यांनी रविवारचा पूर्ण व्यवसाय आपले किराणा दुकान बंद करून रात्री १0 च्या दरम्यान घरी जात असताना इमामवाडा चौकातील नॅशनल मेडिकलसमोर आपल्या घरातील पायरीवर चढत असताना अज्ञात व्यक्तीने हबीब मापारा यांच्या हातातील थैलीला धारदार हत्याराने कापून अंदाजे पाच लाख रुपये असलेली पैशाची थैली हिसकावून पळवून नेली. हबीब मापारा यांनी यावेळी आरडाओरड केली; मात्र तोपर्यंत अज्ञात व्यक्ती रक्कम घेऊन पसार झाला होता. याप्रकरणी हबीब मापारा यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरांनी हैदोस घातला असून, आता मुख्य रस्त्यावर वाटमारीचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.