वाशिम तालुक्यात ४६८ घरकुले साकारणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:13 PM2021-01-18T16:13:29+5:302021-01-18T16:13:43+5:30

Washim News वाशिम तालुक्यातील ४६८ लाभार्थींना घरकुलासाठी निधी मिळणार आहे.

468 houses to be constructed in Washim taluka! | वाशिम तालुक्यात ४६८ घरकुले साकारणार !

वाशिम तालुक्यात ४६८ घरकुले साकारणार !

Next

वाशिम : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) वाशिम तालुक्यात सन २०२०-२१ या वर्षात ४६८ घरकुले साकारली जाणार असून, लाभार्थींनी दलालापासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील बेघर कुटुंबांना घरकुलाचा लाभ दिला जातो. सन २०१६ मध्ये मंजूर यादीनुसार २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षात टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ दिला जात आहे. या मंजूर यादीतील २०२०-२१ हे वर्ष अंतिम असून, वाशिम तालुक्यातील ४६८ लाभार्थींना घरकुलासाठी निधी मिळणार आहे. अनु. जमातीसाठी ११ आणि इतर प्रवर्गातील ४५७ अशा एकूण ४६८ लाभार्थींनी शासन निकषानुसार घरकुलाचे बांधकाम सुरू करावे, अशा सूचनाही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने दिलेल्या आहेत. दरम्यान, घरकुल मंजूर झाले असे सांगून त्रयस्थ व्यक्ती किंवा दलालाकडून लाभार्थींची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सन २०१६ मधील मंजूर यादीनुसार पात्र लाभार्थींना घरकुल मंजूर झालेले असून, लाभार्थींना दलालापासून सावध राहावे असे आवाहन प्रशासनाने केले.

Web Title: 468 houses to be constructed in Washim taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.