जिल्ह्यातील ४५ हजार बांधकाम कामगारांना मिळणार गृहोपयोगी साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:31 IST2021-01-22T04:31:26+5:302021-01-22T04:31:26+5:30
कोरोना काळात बांधकाम व्यवसाय जवळपास बुडीत निघाला होता. साहित्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. बांधकाम व्यवसायावर अवलंबून असलेले जिल्ह्यातील ...

जिल्ह्यातील ४५ हजार बांधकाम कामगारांना मिळणार गृहोपयोगी साहित्य
कोरोना काळात बांधकाम व्यवसाय जवळपास बुडीत निघाला होता. साहित्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे.
बांधकाम व्यवसायावर अवलंबून असलेले जिल्ह्यातील हजारो कामगारांच्या हाताला काम नसल्याने सैरभैर झाले होते. अनेकांचे संसार उघड्यावर आल्याने राज्य सरकारने अशा नोंदणीकृत कामगारांचे संसार पुन्हा उभे राहावेत, यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक कामगारांना बांधकाम साईट बदलल्या नंतर स्थलांतरित व्हावे लागते. स्थलांतर झाल्यानंतर अशा कामगारांना आपला संसार पुन्हा सुस्थितीत मिळावा, या साठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यात बांधकाम क्षेत्रात काम करणारे जवळपास ४५ हजार कामगार आहेत. या सर्व कामगारांना हे गृहोपयोगी साहित्य भेट दिले जाणार आहे.
दरम्यान, ऑनलाईन संकेत स्थळावर कामगार नोंदणी सुरू आहे. कामगारांनी या वर आपली ऑनलाईन नोंदणी करावी जेणेकरून सरकारच्या गृहोपयोगी साहित्याचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
काय असेल साहित्य
ताट चार, वाट्या आठ, पातेले झाकणासह तीन, चमचे, भात वाढी, विविध प्रकारचे डब्बे चार, परात, कढई, प्रेशर कुकर, पाण्यासाठी स्टील टाकी असे एका कुटुंबाला पुरेल एवढे साहित्य या योजनेंतर्गत कामगारांना मिळणार आहे.