पैनगंगा पुनरुज्जीवनासाठी ४.५ कोटी

By Admin | Updated: February 27, 2016 01:57 IST2016-02-27T01:57:22+5:302016-02-27T01:57:22+5:30

टँकरमुक्तीचा संकल्प; हर्षवर्धन सपकाळ यांचे यश.

4.5 million for the revival of Penganga | पैनगंगा पुनरुज्जीवनासाठी ४.५ कोटी

पैनगंगा पुनरुज्जीवनासाठी ४.५ कोटी

बुलडाणा : चार नद्यांचे उगमक्षेत्र असतानाही बुलडाणा तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने भेडसावणार्‍या पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर बांध बांधून पैनगंगेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्यात प्रयत्नातून सुमारे ४ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ९३ लाख ४0 हजारांची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली असून, याबाबतचे आदेश ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहेत.
बुलडाणा तालुका हा शाश्‍वत पर्जन्यमान क्षेत्रामध्ये समाविष्ट असला तरी या तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात कायमस्वरूपी पाणीटंचाईची झळ कायम असते. ही बाब लक्षात घेता आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी कायमस्वरूपी दुष्काळी उ पाययोजना करण्यासाठी पैनगंगेच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न हाती घेतला होता. त्यांनी गेल्या वर्षभरापासून पैनगंगा नदीवरील बॅरेजेस व पुनरुज्जीवनाचा प्रश्न शासनदरबारी लावून धरलेला होता, विशेष म्हणजे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्तिश: स्थानिक ग्रामपंचायतचे पदाधिकारी व नागरिक यांच्या उपस्थितीत प्र त्यक्ष नदी क्षेत्रात जाऊन या कामाचा आराखडा तयार केला होता. त्यामुळे या कामाची स्थळे व त्याचा भविष्यात होणारा फायदा, याबाबत ग्रामस्थांशी चर्चा, तसेच तांत्रिकदृष्ट्याही हा आराखडा निर्दोष राहील, याची खबरदारी घेतली गेली आहे. त्याचा फायदा ग्रामस्थांना होईल.

Web Title: 4.5 million for the revival of Penganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.