शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर-बुलडाणा ४५ किमीच्या प्रवासासाठी लागले पावणेदोन तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 12:04 IST

The 45 km journey from Malkapur to Buldana : ही बस मलकापूर बसस्थानकावरून शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास निघाली आणि दुपारी २ वाजून ४१ मिनिटांनी बुलडाणा येथे पोहोचली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मलकापूर-बुलडाणा हे ४५ किमी अंतर कापण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा आगाराच्या बसला तब्बल  पावणे दोन तास लागल्याचा प्रकार २६ जून रोजी समोर आला. खास्ता हालत असलेली बस तर पाच किमी लांबीच्या राजूर घाटात दोनदा थबकली. चढामध्ये बसला वेगच घेता येत नव्हता. सुदैवाने घाटात अपघात झाला नाही.या संपूर्ण प्रकारामुळे मात्र बसमधील प्रवासी संतापले होते. बुलडाणा आगाराच्या एमेच-०६ एस-८९६४ क्रमांकाच्या बससंदर्भातील ही घटना आहे. ही बस मलकापूर बसस्थानकावरून शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास निघाली आणि दुपारी २ वाजून ४१ मिनिटांनी बुलडाणा येथे पोहोचली. या बसच्या मागून निघालेल्या अनेक बसेस तर सोडा ॲपेरीक्षा सुद्धा या बसला अेाव्हरटेक करत पुढे जात होत्या. बसमध्ये असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे बस वेगच घेत नव्हती.  समुद्र सपाटीपासून २ हजार १९० फूट उंचीवर असलेल्या बुलडाणा शहरालगतच्या राजूर घाटानेतर या खस्ता हालत असलेल्या बसची सत्वपरीक्षाच पाहिली. घाटात दोनदा ही बस थांबली. हा घाट ही बस चढेल की नाही इतपत स्थिती निर्माण झाली होती. प्रवाशांचे दैव बलवत्तर आणि चालकाचे कसब याच्या जोरावर कशीबशी ही बस घाट चढून बुलडाणा बसस्थानकात पोहोचली.तेव्हा बसमधील एका प्रवाशाने बसच्या स्थितीसंदर्भात आगार प्रमुख मोरे यांना फोनवर  कल्पना दिली पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याबाबत  विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

तक्रार पुस्तिकेची शोधाशोधबुलडाणा आगारात बस पोहोचल्यानंतर एका प्रवाशाने नियंत्रण कक्षात तक्रार पुस्तिकेची मागणी केली. त्यावर तेथे १५ मिनिटे तक्रार पुस्तिकेची शोधाशोध करण्यात आली. मात्र त्यानंतरही संबंधित प्रवाशास तक्रार पुस्तिका उपलब्ध करून दिल्या गेली नाही. शेवटी संबंधित प्रवासी पुन्हा सायंकाळी सात वाजता बसस्थानकात पोहोचल व त्यांनी तक्रार पुस्तिका पाठपुरावा करून घेतली आणि त्यात तक्रारही नोंद केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूरstate transportएसटी