४४ गावांमध्ये अंधार!

By Admin | Updated: June 20, 2016 01:59 IST2016-06-20T01:59:29+5:302016-06-20T01:59:29+5:30

वीज वितरण कंपनीचे सबस्टेशन पडले बंद; नागरिकांना अंधारातच काढावी लागली रात्र.

44 cities dark! | ४४ गावांमध्ये अंधार!

४४ गावांमध्ये अंधार!

बुलडाणा : तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या पावसादरम्यान पाडळी, हतेडी तसेच डोंगरखंडाळा येथील वीज वितरण कंपनीचे सबस्टेशन बंद पडल्यामुळे जवळपास ४४ गावांत अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक ग्राहकांना त्रास सहन करावा लागला.
पावसाळ्यात वीज वितरण चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मॉन्सूनपूर्व कामे करण्यात येतात.. त्यात विजेच्या तारांना अडथळा येणार्‍या झाडांची कटाई करण्यात येते. तर काही ठिकाणी दुरुस्ती करण्यात येते. यासाठी लाखों रुपये खर्च येतो. मात्र अनेक ठिकाणी जास्त प्रमाणात झाडांची कटाई करण्यात आल्याचे रेकार्डवर दाखविण्यात येते. तर काही ठिकाणी झाडांची कटाई करण्यात येत नाही. मात्र अशा ठिकाणी हवा आल्यास तार तुटून वीज खंडित होते. अशा कारणामुळे शुक्रवारी रात्री झालेल्या पावसादरम्यान बुलडाणा उपविभागातील पाडळी, हतेडी व डोंगरखंडाळा केंद्रांतर्गत येणार्‍या ४४ गावांत अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे ग्राहकांना अंधारात रात्र काढावी लागली.

Web Title: 44 cities dark!