42 cattle rescued, four arrested | ४२ गुरांना दिले जीवदान, चार जणांना अटक

४२ गुरांना दिले जीवदान, चार जणांना अटक

बुलडाणा : मध्य प्रदेशातून गुरांनी भरलेला ट्रक माेताळा येथे येत आसताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १८ एप्रिल राेजी जप्त करून ४२ गुरांना जीवदान दिले़ तसेच या प्रकरणी चार आराेपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १८ लाख ६२ हजार रुपयांचा एवज जप्त करण्यात आला आहे़

मध्यप्रदेशातून गुरे घेऊन ट्रक येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक बळीराम गिते यांनी मिळाली़ त्यांनी या माहितीच्या आधारे पथके तैनात केली हाेती़ १७ एप्रिल राेजी रात्री मोठा ट्रक मलकापूर येथून मोताळाकडे येताना दिसला़ त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अडवून त्याची पाहणी केली असता त्यात ४७ गुरे आढळली़ त्यापैकी पाच मृत स्थितीत आढळून आली. त्यानंतर ट्रकचालक आयुब खान कुदरत खान, रा. कराड पुलिया भोपाळ, इरफान मुन्ना निहारगड, फिरोज मुबारिक निहारग व फिरोज जाकीर मुलतानी यांना अटक करण्यात आली़ त्यांच्या ताब्यातून ४७ गुरे, दाेन मोबाईल, एक १२ टायर मोठा ट्रक असा एकूण १८ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. गुरांना पुढील योग्य ते पालनपोषणाकरिता श्रीहरी गोशाला बेलाड, ता. मलकापूर, जि. बुलडाणा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ या प्रकरणी पो. स्टे. बोराखेडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई पाेलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पाेलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, अप्पर पाेलीस अधीक्षक हेमराजसिह राजपूत, पाेलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनात सपोनि नागेशकुमार चतरकर, पोउपनि नीलेश शेळके, पोउपनि श्रीकांत जिंदमवार, पोउपनि अनिल भुसारी, पोलीस अमंलदार मिलिंद सोनोने, गजानन आहेर, सतीश जाधव, गजानन गोरले, विजय वारुळे, विजय पैठणे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे बोराखेडी यांच्या संयुक्‍त पथकाने केली.

Web Title: 42 cattle rescued, four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.