सहा महिन्यात ४०८ जण झाले बेपत्ता; २६५ मुलींचा समावेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 11:07 IST2021-07-27T11:07:26+5:302021-07-27T11:07:38+5:30
Missing Cases : अल्पवयीन मुलींबराेबरच १८ वर्षांवरील मुली आणि विवाहिता बेपत्ता हाेण्याचे प्रमाण वाढले आहे.

सहा महिन्यात ४०८ जण झाले बेपत्ता; २६५ मुलींचा समावेश!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींबराेबरच १८ वर्षांवरील मुली आणि विवाहिता बेपत्ता हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात सहा महिन्यात ४०८ जण बेपत्ता झाले आहेत. यामध्ये २६५ मुली व विवाहितांचा समावेश आहे. तसेच मे २०२१ पर्यंत ५० अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या हाेत्या. त्यापैकी पाेलिसांनी २२ जणींचा शाेध घेतला आहे.
माेबाइल, साेशल मीडियाचा वापर वाढल्याने मुली पळून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. जिल्ह्यात अल्पवयीन मुलीबराेबर विवाहिताही बेपत्ता हाेत आहेत. वेगवेगळी आमिषे दाखवून मुलींना फूस लावून पळवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. पालकांनी आपल्या मुलींकडे लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात १३९ पुरुषही बेपत्ता झाले आहेत.