४0 हजार विद्यार्थ्यांनी दिली भगवदगीतेची परीक्षा
By Admin | Updated: August 26, 2014 23:43 IST2014-08-26T23:10:38+5:302014-08-26T23:43:27+5:30
राज्यातील एकमेव उपक्रम : २१ वर्षांपासून सातत्य

४0 हजार विद्यार्थ्यांनी दिली भगवदगीतेची परीक्षा
बुलडाणा: भगवद्गिता हा धर्मग्रंथ नसून जीवनग्रंथ आहे. या ग्रंथातील विचारांपासून प्रेरणा मिळावी, म्हणून अ.भा.पंचकृष्ण प्रबोधन मंडळाच्या वतीने गेल्या २१ वर्षापासून भगवद्गितेच्या अभ्यासावर परीक्षा घेतली जाते. यावर्षी या परीक्षेमध्ये राज्यभरातील ४0 हजार १३0 विद्यार्थी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यावर्षी प्रथमच महाराष्ट्राच्या बाहेरही मध्यप्रदेश व दिल्ली येथून हिंदी भाषिकांनीही या परीक्षेत सहभाग घेतला. अशा प्रकारची परीक्षा घेण्याचा राज्यातील बहुधा हा पहिलाच प्रयत्न असेल. ङ्म्रीक्षेत्र जाळीचा देव संस्थानच्या मार्फत ङ्म्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त राज्यस्तरीय भगवद्गिता ज्ञान स्पर्धा परिक्षा १९९३ पासून सुरू करण्यात आली. अ.भा.पंचकृष्ण प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष प.पु.प.म.आचार्य लोणारकर बाबा यांनी या उपक्रमाची सुरूवात केली. बुलडाणा जिल्ह्यातून सुरू झालेल्या या उपक्रमाला हळूहळू राज्यभरात प्रतिसाद मिळू लागला व आतापर्यंत ही परिक्षा राज्याची सिमा ओलांडून इतर राज्यांमध्येही पोहोचली आहे. गितेच्या १८ अध्यायांपैकी प्रत्येकी ६ अध्यायांचे तिन भाग करून परिक्षेचे स्वरूप भाग १ ते भाग ३ असे ठेवण्यात आले. या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना आकलन होईल, अशा सूलभ भाषेत भगवद्गितेची माहिती देणारे पुस्तके स्वत: लोणारकर बाबा यांनी संपादित केली आहेत. अ.भा.पंचकृष्ण मंडळाच्या वतीने शाळांमध्ये या परीक्षेसंदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांची संख्या नोंदविली जाते. या सर्व विद्यार्थ्यांना आङ्म्रमाच्या वतीने भगवद्गितेची पुस्तके विनामुल्य दिली जातात व ङ्म्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर येणार्या रविवारी ही परीक्षा राज्यभर होते. यावेळी ४0 हजार १३0 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यांचा निकाल तयार झाला असून उद्या २८ तारखेला तो जाहीर करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून ९ बक्षिसांचे वितरण या परीक्षेमध्ये केले जाते.
** कैद्यांनाही भावली गीता
सन २0११ पासून अ.भा.पंचकृष्ण प्रबोधन मंडळाच्या वतीने कारागृहातील बंदीजनांनाही परीक्षेत सामावून घेतल्या गेले. अमरावती, मोर्शी, नागपूर या कारागृहातील कैद्यांनी गितेचा अभ्यास करून परीक्षा दिली. यावर्षी असे ४३ कैदी परीक्षेला बसले होते. या सर्व कैद्यांनी मंडळाकडे परीक्षेचे अभिप्राय पाठविले आहेत, हे विशेष. मोर्शी येथील खुले कारागृहातील बंदी विलास भोईटे यांनी जिवनात झालेल्या चुकीमुळे मन:शांती हरविली होती. मात्र या परीक्षेच्या अभ्यासामुळे स्वत:मध्ये बदल झाल्याचे जाणवते, असे सांगितले. अशीच प्रतिक्रिया ज्ञानेश्वर बंडेवार यांचीही आहे.