बुलडाणा जिल्हय़ातील ३८ गावात एचआयव्ही एड्समुक्तीचा जागर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:41 IST2017-12-01T00:40:54+5:302017-12-01T00:41:12+5:30
एचआयव्ही एड्स या महाभयंकर रोगाचा संसर्ग रोखण्याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा समन्वयक प्रमोद टाले यांच्या पुढाकारातून एचआयव्ही एड्समुक्त गाव ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात ये त आहे. यासाठी शंभर गावांची निवड करण्यात आली असून, आतापर्यंत ३८ गावात मोहीम राबवून ग्रामस्थांचे समुपदेशन करण्यात आले आहे.

बुलडाणा जिल्हय़ातील ३८ गावात एचआयव्ही एड्समुक्तीचा जागर!
हर्षनंदन वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : एचआयव्ही एड्स या महाभयंकर रोगाचा संसर्ग रोखण्याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा समन्वयक प्रमोद टाले यांच्या पुढाकारातून एचआयव्ही एड्समुक्त गाव ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात ये त आहे. यासाठी शंभर गावांची निवड करण्यात आली असून, आतापर्यंत ३८ गावात मोहीम राबवून ग्रामस्थांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्यावतीने एचआयव्ही एड्समुक्त गाव मोहीम जुलै महिन्यापासून जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्या समु पदेशन व चाचणी (आयसीटीसी) केंद्रातील समुपदेशकांमार्फत राबविण्यात ये त असून, गावकर्यांमध्ये एचआयव्ही एड्समुक्तीचा जागर केला जात आहे. एड्समुक्तीसाठी निवडलेल्या गावात नव्याने कुणाला एचआयव्ही संसर्ग होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत ग्रामस्थांचे समुपदेशन केले जात आहे. एचआयव्ही एड्स कसा होतो, कशामुळे होतो, तो कसा टाळला जाऊ शकतो, त्यावरील उपाय आणि उपचार याबाबत माहिती समजावून सांगितली जात आहे. युवा वर्ग, समलिंगी संबंध ठेवणार्या व्यक्ती, महिला मंडळ, बचतगट, युवा गट, आशा स्वयंसेविका, सरकारी कर्मचारी यांच्यासह सर्वांचे समुपदेशन केले जात आहे. २0२0 पर्यंत नव्याने कुणालाच या संसर्गाची लागण होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घेण्यात येत आहे.
या मोहिमेची सुरूवात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणाराजा येथून करण्यात आली असून, आतापर्यंत ३८ गावात मोहीम राबविण्यात आली आहे. यावेळी मोहीम राबविण्यात आलेल्या गावात प्रत्येक व्यक्तीची एचआयव्ही चाचणी करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत सरकारी कर्मचारी व अन्य लोक सायंकाळी उशिरा घरी येत असल्यामुळे आयसीटीसीचे कर्मचारी रात्री आठ वाजेपर्यंत थांबून सभा घेऊन जनजागृतीचे काम करीत आहेत. तपासणीदरम्यान एखादा संसर्गित आढळल्यास त्याच्यावर नियमित उपचार करून इतरांना लागण होऊ नये, याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय गावकर्यांच्या सहकार्यातून घोषवाक्यांनी भिंती रंगविणे, प्रभातफेरीचे उपक्रम राबत आहे.
१८ आयसीटीसी केंद्राद्वारे समुपदेशन
एड्समुक्तीचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक-समुपदेशन संवाद कार्यक्रम आयसीटीसीमार्फत हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील १८ आयसीटीसी केंद्राच्या समुपदेशकांनी एचआयव्ही एड्सबाबत शिक्षकांचे समु पदेशन केले आहे. शाळेत जाऊन समुपदेशक एक तास मार्गदर्शन करीत असून, आतापर्यंत जिल्ह्यातील आठशे शिक्षकांची एचआयव्ही चाचणी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. यावेळी एकूण ३ हजार ४६0 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून, एक व्यक्ती एचआयव्ही बाधित आढळून आला आहे.
या गावात राबविण्यात आली मोहीम
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाद्वारे एचआयव्ही एड्समुक्त गाव मोहीम जिल्ह्यातील ३८ गावात राबविण्यात आली. त्यात रूईखेड, अंभोडा, पांगरी, अजिसपूर, दहीद, कदमापूर, जयपूर लांडे, कंजारा, जानोरी, एकलारा, बावनविर, मनुबाई, शेलापूर बु., डिडोळा, चांडाळवाडी, वाघोदा, फैजपूर, नायगाव, मेहुणाराजा, सावखेड भोई, असोला, मांडवा, उमराअटाळी, आसा, सातगाव, दुधा, भोसा, माळ सावरगाव, शिवणीटाका, उमरेड, डोड्रा, नारायणखेड, चाळीसटापरी, गोमाळा, भिंगारा, मराखेड, असलमपूर, दहीगाव यांचा समावेश आहे.