अन ३८ प्रवाशांच्या हृदयाचा ठोका चुकला!

By Admin | Updated: April 27, 2017 19:32 IST2017-04-27T19:32:51+5:302017-04-27T19:32:51+5:30

नांदुरा- बुलडाणा आगाराची धाड-जळगाव जामोद ही बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने नांदुऱ्याजवळील येरळी गावाजवळ मार्गाच्या कडेला उतरली.

38 passengers lost their heartbeat! | अन ३८ प्रवाशांच्या हृदयाचा ठोका चुकला!

अन ३८ प्रवाशांच्या हृदयाचा ठोका चुकला!

नांदुरा : बुलडाणा आगाराची धाड ते जळगाव जामोद ही एसटी महामंडळाची बस २७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने नांदुऱ्याजवळील येरळी गावाजवळ मार्गाच्या कडेला उतरली. सुदैवाने अपघात टळला तरी, बसमधील ३८ प्रवाशांच्या हृदयाचा ठोका मात्र चुकला.
व बसमधील ३८ प्रवाशांचा ठोका चुकला. सुदैवाने बस रोडकडेच्या मातीत अडकली व यामध्ये काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले.
बुलडाणा आगाराची एमएच४०एन-८९३९ क्रमांकाची धाड ते जळगाव जामोद बस नांदुऱ्यावरून जळगाव जामोदकडे जात असताना नवी येरळी जवळ चालकाचे नियंत्रण गेल्याने बस रोडकडेला घसरली. त्यामुळे प्रवाशांची ओरड ऐकुन परिसरातील वाहनधारक व शेतकरी मदतीला धावले. बस रोडकडेच्या मातीत अडकल्याने मोठा अपघात टळला. काही किरकोळ जखमींना नांदुरा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. बकऱ्यांचा कळपमध्ये आल्याने बस बाजुला घेत असताना घसरली, अशी माहिती चालक उपस्थितांना देत होता.

Web Title: 38 passengers lost their heartbeat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.