३७ हजारांची अवैध दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:46 IST2017-10-13T00:44:08+5:302017-10-13T00:46:35+5:30

खामगाव : दारूचे बॉक्स घेऊन जाणारी इंडिका कार डीवायएस पी पथकाने शेगाव रोडवरून पकडली. यावेळी पोलिसांनी दारूचे  बॉक्स व इंडिका जप्त करून दोघांना अटक केली आहे.

37 thousand illegal liquor seized | ३७ हजारांची अवैध दारू जप्त

३७ हजारांची अवैध दारू जप्त

ठळक मुद्देखामगाव पोलिसांची कारवाई; दोघांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : दारूचे बॉक्स घेऊन जाणारी इंडिका कार डीवायएस पी पथकाने शेगाव रोडवरून पकडली. यावेळी पोलिसांनी दारूचे  बॉक्स व इंडिका जप्त करून दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीवायएसपी पथकाने  बुधवारी रात्री १0 वाजताच्या दरम्यान शेगाव रोडवर विद्युत वि तरण कार्यालयानजीक इंडिका क्र.एमएच २७ एसी ७१0७ ची  तपासणी केली असता सदर गाडीत देशी दारूचे १५ बॉक्स (किं.  ३७७४0) आढळून आले. यावेळी पोलिसांनी दारूचे बॉक्स व  इंडिका असा एकुूण २ लाख ७४४0 रुपयांचा मुद्देमाल जप्त  केला, तर याप्रकरणी दारू घेऊन जाणारे बाबूलाल रामचंद्र  आयने (वय ४२) व अनिल प्रल्हाद अडचुले (४५) दोन्ही रा.  व्याळा ता. बाळापूर यांच्याविरुद्ध कलम ६५ (ई) (क)  मदाकानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई  डीवायएसपी पथकातील पोउपनि रूपेश शक्करगे, पो.ना. नितीन  भालेराव व पोकाँ सुधाकर थोरात यांनी केली. 

Web Title: 37 thousand illegal liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.