घाटनांद्रा येथे ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 00:13 IST2017-04-28T00:13:01+5:302017-04-28T00:13:01+5:30
जानेफळ : मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा येथील एका ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ एप्रिल रोजी उघडकीस आली.

घाटनांद्रा येथे ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या
जानेफळ : मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा येथील एका ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ एप्रिल रोजी उघडकीस आली.
यासंदर्भात घाटनांद्रा येथील सुनील प्रेमचंद जाधव (३५) या इसमाने गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या राठोड यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, जानेफळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.