बॅगमधून ३५ हजार लंपास
By Admin | Updated: November 8, 2014 23:38 IST2014-11-08T23:38:48+5:302014-11-08T23:38:48+5:30
खामगाव येथील घटना

बॅगमधून ३५ हजार लंपास
खामगाव (बुलडाणा) : एका खासगी कंपनीत काम करणार्या सेल्स एक्झिकेटीव्हच्या बॅगमधून अज्ञात चोरट्याने ३५ हजाराची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. रवींद्र सुरेश कदम (वय ४३) रा. शांती नगर अमरावती हे नागपूर येथील फ्रेमींग को रेफ्रेक्टरी या खासगी कंपनीत सेल्स एक्झिकेटिव्ह पदावर काम करतात. कंपनीच्या वसुली कामी ते काल नांदुरा येथे आले होते. त्याठिकाणी काही जणांकडून कंपनीची थकबाकी वसुली करून काळी-पिवळीने कदम हे खामगावात आले. त्यांनी येथील अशोक गेस्ट हाऊसमध्ये रूम बुक करून तेथे वसुली करण्यात आलेल्या रकमेचा हिशेब केला असता, बॅगमधील ३५ हजार ७९0 रुपये लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली