पीक कर्जाचे ३५ टक्के वाटप

By Admin | Updated: June 20, 2016 02:04 IST2016-06-20T02:04:31+5:302016-06-20T02:04:31+5:30

बुंलडाणा जिल्ह्यात ५४ हजार शेतक-यांना लाभ; शेतक-यांना ४८0 कोटी ८६ लाख रुपये वाटप

35 percent allotment of crop loan | पीक कर्जाचे ३५ टक्के वाटप

पीक कर्जाचे ३५ टक्के वाटप

बुलडाणा: मॉन्सून उंबरठयावर येऊन ठेपला आहे, पेरणीपूर्व मशागत आटोपली असताना शेतकर्‍यांना बी-बियाणे, खते, पेरणीसाठी पीक कर्जाची नितांत गरज आहे. जिल्हाधिकार्‍यांनी पीक कर्ज वाटपाचे नियोजन करून देत प्रत्येक बँकेला उद्दिष्ट दिले असून, १८ जूनपर्यंंंत केवळ ३५ टक्केच खरीप पीक कर्ज वाटप झाले आहे. जिल्हा दुष्काळाची झळ सोसत असलेल्या शेतकर्‍यांना पीक कर्जासाठी शासनाच्या विविध सवलती जाहीर झाल्या आहेत. पुन्हा नव्याने दिलासा देत बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंंंत ५४ हजार ४९0 विविध बँकेच्या खातेदार शेतकर्‍यांना सहकारी, राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून ४८0 कोटी ८६ लाख रुपयांचे खरीप पीक कर्ज वितरित केले आहे. पीक कर्ज वाटपात जिल्ह्यात ३५ राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी, खाजगी बँका सहभागी झाल्या आहे. खरीप हंगाम २0१६-१७ मध्ये १ लाख ३६ हजार ५१६ शेतकर्‍यांना पिक कर्ज वाटप प्रक्रियेत सहभागी करुन घेत, खरीपासाठी १२८१ कोटी ५२ लाख रुपये तसेच रब्बीसाठी ८३ कोटी ६४ लाख रुपये इतके पीक कर्ज वाटपाचे लक्ष्यांक ठेवण्यात आले आहे. पावसाचा अंदाज घेत, शेतकर्‍यांनी अद्याप पेरण्या सुरू केल्या नाहीत. मात्र खरिपासाठी पीक कर्ज वाटप प्रक्रिया जिल्ह्यात साधारणत: दीड महिन्यापूर्वी सुरू करण्यात आली. सेंट्रल बँकेकडून प्राप्त माहितीनुसार १८ जूनपर्यंंंत जिल्ह्यातील ५४ हजार ४९0 शेतकर्‍यांना ४८0 कोटी ८६ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे. याची टक्केवारी ३५ टक्के दर्शविण्यात आली आहे.

Web Title: 35 percent allotment of crop loan