बुलडाणा जिल्ह्यातील ३४00 रुग्णांनी घेतला लाभ
By Admin | Updated: December 8, 2014 01:28 IST2014-12-08T01:28:20+5:302014-12-08T01:28:20+5:30
जीवनदायी योजनेला एक वर्ष पूर्ण : उपचारापोटी रुग्णालयांना १४ कोटी रुपये प्रदान

बुलडाणा जिल्ह्यातील ३४00 रुग्णांनी घेतला लाभ
फहीम आर. देशमुख / शेगाव
गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणार््या गोरगरीब रुग्णांना शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार दिला आहे. या योजनेला बुलडाणा जिल्ह्यात एक वर्ष पूर्ण झालेले असून, या योजनेला शासनाने पुढील एक वषार्साठी नू तनीकरण करून राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्यातील दारिद्रय रेषेखालील पिवळे शिधापत्रिकाधारक व दारिद्रय़रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक, रुपये एक लक्ष किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारी कुटुंबे, अं त्योदय व अन्नपुर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबासाठी विमा कंपनीच्या सहभागाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना २ जुलै २0१२ पासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने कमी उत्पन्न गटांच्या लाभार्थ्यांसाठी चालू केलेली ही मह त्वाकांक्षी योजना आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सध्या पहिल्या टप्प्यात ८ जिल्ह्यांमध्ये २ जुलै २0१२ पासून राबविण्यात आली. तर महाराष्ट्रातील उर्वरीत सर्व जिल्ह्यात ही योजना २१ नोव्हेंबर २0१३ ला सुरु करण्य़ात आली. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश होता. या योजनेला आता १ वर्षाच्या कालावधी पुर्ण झालेला असुन जिल्ह्यातील ३५00 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या पोटी शासनाने १४ कोटी ११ लक्ष रुपये खर्च केल्याचे दिसुन येते.
आतापयर्ंत या योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ह्दय शस्त्रक्रियेसाठी ३९८ रुग्णांनी, अ ितदक्षता विभागात ९0 रुग्णांनी, ह्दयरोगासाठी ५२२ रुग्णांनी, कान नाक घसा शस्त्रक्रियेसाठी २६१५ रुग्णांनी, पोटांच्या शस्त्रक्रियेसाठी ५१0 रुग्णांनी, कॅन्सर उपचार १९१२ रुग्णांनी, डायलेसीस ५७७ रुग्णांनी, हाडाची शस्त्रकीया १९१ रुग्णांनी, न्युरोसर्जरी (मेंदुच्या शस्त्रक्रीया) १२0 रुग्णांनी, या योजनेचा यशस्वीपणे लाभ घेतला आहे. या रुग्णांना फायदा देणार्या रुग्णालयांना उपचारापोटी १४ कोटी ११ लाख ९३ हजार ७१0 रुपये प्रदान करण्यात आल्याची माहिती राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक अमोल लहाने यांनी दिली.