‘गोरक्षण’मध्ये पोहोचला ३४ टन चारा!
By Admin | Updated: June 14, 2016 02:08 IST2016-06-14T02:08:51+5:302016-06-14T02:08:51+5:30
शेगाव येथील गजानन महाराज संस्थानचा पुढाकार

‘गोरक्षण’मध्ये पोहोचला ३४ टन चारा!
नांदुरा (जि. बुलडाणा) : चाराटंचाईमुळे महादेव गोरक्षण संस्थानमधील अनेक गायी मृ त्युमुखी पडत असल्याने या गायींना वाचविण्यासाठी गजानन महाराज संस्थानने पुढाकार घेतला आहे. काल १२ जून रोजी संस्थानने तब्बल ९00 कि.मी. अंतरावरील मध्य प्रदेशा तील सागर जिल्ह्यातून प्रत्येकी १७ टन वजनाचे २ ट्रक कुट्टी गोरक्षणमध्ये पाठविली आहे. नांदुरा येथील महादेव गोरक्षण संस्थेच्या आमसरी शिवारात शेकडो गायी असून, स ततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाई सोबत चाराटंचाईचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच गायीचे पालनपोषण करण्यास असर्मथ ठरलेल्या २५0 पशुपालकांनी त्यांच्या गायी या गोरक्षणामध्ये आणून सोडल्याने या गायींची संख्या आता ५00 च्या वर गेल्याने चार्याअभावी अनेक गायी मृत्यूच्या दाढेत गेल्या आहेत. संस्थानच्यावतीने गायींच्या संगो पनासाठी अतोनात प्रयत्न सुरु आहेत. मात्र पैसे मोजूनही चारा मिळत नसल्याने संस्थान ह तबल झाले आहे. दानदात्यांनी चार्यासाठी मदत करण्याचे आवाहन संस्थानने केल्याने शेगाव येथील गजानन महाराज संस्थानने या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी तब्बल ३४ टन कुट्टीचे २ ट्रक ९00 कि.मी. अंतरावरुन आणून या गोरक्षण संस्थानला दिले आहेत. त्याचप्रमाणे गजानन स्टोन क्रशर पिंप्री देशमुख यांनी चारा कुट्टीकरिता नऊ हजार रुपये, नांदुरा येथील बांधकाम व्यावसायिक प्रमोद खोंड यांनी नऊ हजार रुपये, मेहकर येथील सत्यनारायण ओमप्रकाश लोहिया यांनी पाच हजारांची देणगी गोरक्षण संस्थानला दिली आहे.